शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना हवामान खात्याचे सिग्नल

By विकास राऊत | Published: December 08, 2023 6:59 PM

कुणीच बोलेना : तारीख पे तारीखच्या खेळात सगळे काही रखडले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी मंजूर झालेले एक्स किंवा सी- बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी देऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र दिल्ली आणि मुंबईतील हवामान खात्यातील काही महाभागांच्या अंतर्गत राजकारणामुळे रडार बसविण्यास ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे.

चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी होत असून, सुमारे १ लाख हेक्टरवरील खरीप हंगामाची माती झाली. यंदा तर पावसाने दडीच मारल्याने खरीप हंगाम गेला, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पिकांची माती केली.मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्ररीत्या संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स किंवा सी-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याची मागणी पुढे आली. शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. मात्र, तो मिळत नसल्याने लहरी हवामानाचा परिणाम शेती व औद्योगिक विकासावर झाला.

दहा महिन्यांपासून ठप्पआयएमडी विभागाच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन, भांगसीमाता गड, गोगाबाबा टेकडी व कच्ची घाटी, सातारा परिसरातील जागांची पाहणी केली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल दिला. जुलै महिन्यात म्हैसमाळ येथील उंच जागा आयएमडीने निश्चित केली. जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. मात्र, पुढे काहीच नाही.

काही सांगता येणार नाहीमराठवाड्यातील रडार कधी बसेल, कोणते बसेल, यावर मला काही सांगता येणार नाही. याबाबत विज्ञान मंत्रालयच सांगू शकेल. -डॉ.अनुपम कश्यप, आयएमडी इन्चार्ज, पुणे.

लोकमत करीत आहे पाठपुरावाजून, २०२१ पासून लोकमत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करीत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत, केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर, ५० कोटींच्या खर्चातून चार्तून सी-डॉप्लर बॅण्ड रडार बसविण्यासाठी मार्च, २०२२ मध्ये मंजुरी मिळाली.

एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचेअवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. बोटांएवढ्या आकारमानाच्या ढगात किती बर्फ कण, पाण्याची वाफ, थेंब आहेत. याचा एक्स-रे रडार काढते. कोणत्या अक्षांश, रेखांशावर किती वाजता, किती मिलीमीटर पाऊस पडेल, ढगफुटी होणार की दुष्काळ पडणार, हे त्यातून कळते. सी-बॅण्ड डॉप्लर रडार मराठवाड्यात बसविण्याच्या हालचाली सुरू असून, त्याऐवजी एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचे आहे.-प्रा.किरणकुमार जोहरे, हवामान शास्त्रज्ञ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण