लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: भारतात होणाºया १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेअंतर्गत मुंबईमध्ये ६ सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी संपूर्ण राज्यात फुटबॉल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातही या स्पर्धेच्या वातावरणनिर्र्मितीसाठी १५ सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.महाराष्ट्र मिशन-१ मिलियन या संकल्पनेतून ही वातावरणनिर्मिती केली जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्यात १ लाख फुटबॉल वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळाचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यात आजघडीला या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ३७७ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेला दोन फुटबॉल देण्यात येतील. उर्वरित फुटबॉल उशिरा आॅनलाईन नोंदणी केलेल्या शाळांना प्रत्येकी १ या प्रमाणे देण्यात येईल.फुटबॉल फेस्टिव्हल अंतर्गत १५ सप्टेंबर रोजी शहरात भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, भारत स्काऊट गाईडचे कॅडेट, विविध संघटनांचे खेळाडू, पदाधिकारी, फुटबॉलप्रेमी रॅलीमध्ये सहभागी होतील. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते गोकुळनगर येथील इंदिरा गांधी मैदानापर्यंत ही रॅली जाणार आहे. १५ सप्टेंबर रोजीच फुटबॉल खेळाचे प्रात्यक्षिके, प्रदर्शनी सामने इंदिरा गांधी मैदानावर होणार आहेत.दुपारी चार वाजता जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र विरुद्ध विविध संघटना, पदाधिकारी यांच्यात प्रदर्शनी सामना होणार आहे. तर कीड्स किंगडम पब्लिक स्कूल येथे १७ वर्षांतील मुलाच्या गुडलक फुटबॉल स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी हे करतील तर शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू रामलू पारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. १३ सप्टेंबर रोजी विजयनगर हनुमान मंदिर मंगल कार्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धा होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी गंगालाल यादव, निवासी उपल्हिाधिकारी जयराज कारभारी आदींची उपस्थिती होती.
महाराष्टÑ मिशन-एक मिलियनची जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:32 AM