औरंगाबाद : गांधीनगर येथील रहिवासी अरमान खान अजीज खान याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोन वर्षे सुखी संसार चालल्यानंतर अरमान खान याने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. विवाहितेने माहेरुन पैसे आणण्यास असमर्थता दाखविल्यानंतर पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
By | Published: December 02, 2020 4:08 AM