शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !

By admin | Published: May 02, 2016 11:41 PM

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला.

ममदापूर परळीतील प्रकार : नवरीविनाच वऱ्हाडाला परतण्याची ओढावली नामुष्कीअविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाईनवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला. गावात एकाच मांडवात सहा लग्न होणार होते. पैकी पाच विवाह झाले. मात्र, एका वऱ्हाडाला व नवरदेवाला नवरीविनाच परतावे लागले. ममदापूर (परळी) येथील सीता ग्यानदेव लवटे हिचा विवाह धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथील बाबाराव चंद्रकांत काळे याच्याशी जुळला होता. विवाहासाठी १ मे रोजी दुपारी १२.३५ चा मुहूर्त निवडला होता. या विवाहासोबतच इतर पाच विवाहही होणार होते. एका मांडवात सहा विवाह असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. रविवारी वधूपित्यांसह गावकरी लगबगीत होते. पोलीस व महसूल प्रशासनाची दोन वाहनेही गावात धडकली. सुरुवातीला हे सरकारी पाहुणे विवाहासाठी आले असावेत, असे वाटले;पण झाले वेगळेच. अधिकाऱ्यांनी थेट सीता लवटे, बाबाराव काळे या जोडप्याची चौकशी सुरु केली. नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर, मंडळ अधिकारी बाबूराव दळवी, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ गिते यांनी शहानिशा केली असता नवरीचे वय १५ तर नवरदेवाचे वय १७ एवढे असल्याचे समोर आले. लेखी घेतलेमहसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पंचानामा केला. त्यानंतर वधू- वर व त्यांच्या नातेवाईकांकडून अल्पवशीन असल्याने विवाह रद्द करत असल्याचे लेखी लिहून घेतले. तक्रार अर्जावरुन कारवाईनवरदेवाच्या भावकीतील एकाने ममदापूर (परळी) येथे बालविवाह होत असल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षकांसह तहसीलदार, ग्रामीण ठाणे निरीक्षक यांच्याकडे केली होती. अर्जासोबत नवरदेवाची जन्मतारीख ५ जुलै १९९९ असल्याचा निर्गम उतारा व लग्नपत्रिका पुरावा जोडला होता. त्यावरून खातरजमा झाली.बोहल्यावर चढण्यापूर्वीच बाबाराव- सीताचा हिरमोड !बाबाराव व नियोजित वधू सीता हे दोघेही गरीब कुटुंबातील. अल्पवयीन ठरल्याने त्यांचा विवाह रोखण्यात आला. इतर पाच विवाह ठरल्याप्रमाणे झाले. अंगावर हळद... हातावर मेहंदी... डोक्यावर मुंडावळ्या... व बोहल्यावर चढण्याचे वेध लागलेल्या बाबाराव व सीता यांना अपुऱ्या वयामुळे ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. त्यांना इतर पाच जोडप्यांच्या विवाहात वऱ्हाडी बनण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर वरपक्षाकडील मंडळी नवरीविनाच आपल्या गावी परतले.