शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

मंठा येथे विवाहितेचा खून, पती फरार

By admin | Published: August 26, 2016 12:21 AM

जालना / मंठा : न्यायालयात दाखल केलेला दावा मागे का घेतला नाही या कारणावरून आरोपी बबन बापूराव आघाव रा. अंभोरा शेळके याने पत्नी कमल आघाव हिच्या डोक्यात

जालना / मंठा : न्यायालयात दाखल केलेला दावा मागे का घेतला नाही या कारणावरून आरोपी बबन बापूराव आघाव रा. अंभोरा शेळके याने पत्नी कमल आघाव हिच्या डोक्यात धारदार वस्तुने वार करून तिचा खून केल्याची घटना २० आॅगस्ट रोजी अंभोरा शिवारात घडली. सरस्वती जानूजी यिप्पर (६०) रा. वडव ता. लोणार जि. बुलडाणा यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी मंठा पोलिस ठाण्यात कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.घरगुती कारण आणि जमिनीच्या वादातून पती बबन याच्याविरुद्ध कमल हिने कोर्टात केस दाखल केली होती. याबाबत वारंवार तक्रार मागे घेण्याचा तगादा लावूनही कमल केस मागे घेत नसल्याचा राग बबन याचा मनात होता. दररोजच्या कुरबुरीमुळे कमल ही आई वडीलाकडे वडव ता. लोणार येथे राहत होती. १९ आॅगस्ट रोजी बबन याने कमल हिला वडव येथून मोटरसायकले आणत असताना रस्त्यातच दोघांत कुरबूर झाली त्याच कुरबुरीतून आरोपी बबन याने कमल हिच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करून ठार केले. याची कुठे वाच्यता होवू नये म्हणून आरोपीने तिचे प्रेत गट क्रमांक ७८ येथील विहिरीत टाकले. मुलीचा शोध लागत नसल्याने सरस्वतीबाई जानूजी यिप्पर यांनी गुरूवारी मंठा पोलिस ठाण्यात बबन आघाव याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप पती फरार आहे. (वार्ताहर)