शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

मसिआ, जि. प., जॉन्सन संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:19 AM

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२0 क्रिकेट स्पर्धेत मसिआने बीमटा संघावर ९ गडी, तर जि. प.ने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर संघावर १२ धावांनी आणि जॉन्सनने बजाज आॅटोवर ३ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात मधुर पटेल, सचिन लव्हेरा आणि अनिरुद्ध पुजारी सामनावीर ठरले.

ठळक मुद्देटी २0 क्रिकेट स्पर्धा : मधुर, सचिन, अनिरुद्ध सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२0 क्रिकेट स्पर्धेत मसिआने बीमटा संघावर ९ गडी, तर जि. प.ने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर संघावर १२ धावांनी आणि जॉन्सनने बजाज आॅटोवर ३ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात मधुर पटेल, सचिन लव्हेरा आणि अनिरुद्ध पुजारी सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात बीमटाने ५ बाद १५५ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार नीलेश जाधवने ४३ चेंडूंत ६ षटकार व ५ चौकारांसह ८१ धावा केल्या. महेश दहीवरने २८ व प्रवीण नागरेने २५ धावा केल्या. मसिआकडून हितेश पटेलने २, तर रोहन मोरे, धर्मेंद्र पटेल, रोहन राठोड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मसिआने विजयी लक्ष्य १६ षटकांत १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मधुर पटेलने ३0 चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ६0 धावा केल्या. शेख मुकीमने २६ चेंडूंत २ षटकार व ७ चौकारांसह ५३ व संदीप भंडारीने ४ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या.दुसऱ्या सामन्यात जि.प.ने ७ बाद १८0 धावा ठोकल्या. त्यांच्याकडून सचिन लव्हेराने ३२ चेंडूंतच ३ षटकार व ६ चौकारांसह ५९ धावा केल्या. कर्णधार सय्यद आरिफने १८ चेंडूंत ३३, विजय अडलाकोंडाने २३ व अरुण लाडने २२ धावा केल्या. गणेश गोरक्षकने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चरने १६८ धावा केल्या. त्यांच्याकडून अजय कावळेने ४४, रणजित राजपूतने ३७ व गणेश गोरक्षकने २६ धावा केल्या. जि.प.कडून विजय सोनवणेने ३ व भाऊसाहेब गर्जे व प्रदीप जाधव यांनी अनुक्रमे २ व १ गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात बजाज आॅटोने ९ बाद ११९ धावा केल्या. त्यांच्याकडून महेश पाडळकरने ४६, सागर तळेकरने १८ धावा केल्या. जॉन्सनकडून अक्षय चव्हाण, अनिरुद्ध पुजारी व नीरज एस. यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जॉन्सन संघाने विजयी लक्ष्य ७ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून अनिरुद्ध पुजारीने ३६, नीश पुजारीने २७, योगेश केदारेने १७ धावा केल्या. बजाजकडून अक्षय आम्हाडे, अली बकोदा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.