कार्यक्रमाची सुरुवात कीर्ती पाटणी यांनी मंगलाचरण करून केली. यावेळी मीना सुनील पाटणी अंधारीवाले यांचा सत्कार करण्यात आला. शकुंतला लक्ष्मीचंदजी बडजाते, आलोक बडजाते दुर्गवाले यांच्याकडून सामूहिक महाप्रसाद आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास न्यायमूर्ती कैलासचंद चांदीवाल, राजाबाजार खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराचे पंचायत एम. आर. बडजाते, अशोक अजमेरा, डॉ. रमेश बडजाते, माणिकचंद गंगवाल, चांदमल चांदीवाल, आनंद सेठी, अनिल कासलीवाल, विनोद कासलीवाल यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा मोनिका चांदीवाल, सचिव दीपाली पांडे, उपाध्यक्षा स्वाती कासलीवाल, कोषाध्यक्ष जयश्री लोहाडे, दीपिका बडजाते, अनुपमा दगडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी जैन टॅगच्या माजी अध्यक्षा यशिका पांडे, रिची कासलीवाल, श्वेता कासलीवाल, सिम्मी पहाडिया, रचना पहाडे, पूर्वा कासलीवाल, राणू सेठी, रिना ठोले, सपना पाटणी, नेत्रजी कासलीवाल, कीर्ती पाटणी, मिताली काला, पूजा झांगरी, श्वेता गंगवाल, सीमा बडजाते, श्वेता सेठी यांचा सहभाग होता. प्रतिष्ठाचार्य श्री. पं. नंदकुमार चंद्रकांतजी सदावर्ते (शिवूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा झाली. प्रास्ताविक मोनिका चांदीवाल यांनी केले. सूत्रसंचालन सारिका बडजाते यांनी केले. उज्ज्वला पाटणी यांनी आभार मानले.
फोटो ओळ..
जैन टॅगतर्फे आयोजित सामूहिक रोटतीज व्रत उद्यापन पूजाप्रसंगी उपस्थित महिला.