औरंगाबाद : वाळूज उद्योगनगरीतील कास्टझी या केमिकल कंपनीला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल तासभरानंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आले नसून अग्निशमन दलाचे पाच बंब आणि खाजगी टँकरद्वारे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीत मस्तराम नावाचा एक कामगार भाजल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. दरम्यान, आग शेजारील तायो निपोन सान्सो या गॅस उत्पादन करणाऱ्या कंपनीत सुद्धा पसरली आहे.
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कास्टझी या केमिकल कंपनीला अचानक आग लागली. या कंपनीत केमिकलचे उत्पादन करण्यात येते. केमिकलमुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. कंपनीतील सिलेंडरचे स्फोट झाल्याने आग पसरत गेली. यात मस्तराम नावाचा एक कामगार किरकोळ भाजला असून त्यावर उपचार सुरु आहेत.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मनपाचे अग्निशमनचे बंब दाखल झाले. तसेच एमआयडीसीतील बजाज ऑटो आदी कंपन्याचे बंब आणि खाजगी टँकर सुद्धा आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. एक तासापासून सुरु असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत असतानाच आगीने शेजारील तायो निपोन सान्सो या गॅस उत्पादन करणाऱ्या कंपनीला कवेत घेतले. यामुळे आगीने आता रौद्ररूप धारण केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.