औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या इंटर अकॅडमी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी मास्टर अकॅडमीने माने अकॅडमीचा व जाधव ब संघाने कीर्तिकर अकॅडमीचा पराभव केला. रामेश्वर चलके व आकाश बोराडे सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात मास्टर अकॅडमीने ३0 षटकांत ३ बाद २६४ धावा केल्या. त्यांच्याकडून आकाश बोराडेने ११0 चेंडूंत १७ चौकार व ३ षटकारांसह १४६, आदर्श बागवाले याने ५३ चेंडूंत ४ षटकार व ५ चौकारांसह ७५ धावा केल्या. माने अकॅडमीकडून सन्नी बारवालने २ व विशाल ढाकरेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात माने अकॅडमीचा संघ २७.३ षटकांत १८0 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून शाहबाज खान व आदित्य मदगे यांनी प्रत्येकी ३६, तर आशिष शिंदेने ३३ व युवराज वायाळने २५ धावा केल्या. आदर्श बागवालेने ३, तर पवन मेघावाले व अतुल अंजनवाड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसऱ्या सामन्यात जाधव अ ने २५.५ षटकांत १२५ धावा केल्या. त्यांच्याकडून रामेश्वर चालकेने २७, सूरज साळवेने २५ व क्षितिज कपूरने २१ धावा केल्या. कीर्तिकर संघाकडून किशोर क्षीरसागरने २२ धावांत ४ व अक्षय सातदिवेने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात कीर्तिकर अकॅडमीने २0.२ षटकांत सर्वबाद ९४ धावा केल्या. त्यांच्याकडून हर्ष कीर्तिकरने २४ धावा केल्या. जाधव अ संघाकडून रामेश्वर चालकेने २१ धावांत ४ व अभिजित भगत व आकाश चोपडे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
मास्टर अकॅडमी, जाधव अ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:49 AM