लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बनावट नोटा छापणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराला उस्मानपुरा पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या. तो ग्राफिक आणि वेब डिझाईनर असून, सात वर्षे त्याने दुबईत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केली. त्याच्याकडून आणखी पावणेदोन लाखांच्या बनावट नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, पेपर आणि कटर पोलिसांनी जप्त केले.इम्रान खान करीम खान पठाण (३०, रा. कंधार, जि.नांदेड, ह. मु. मेंहदीपट्टम, हैदराबाद, तेलंगणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिशांत राजा साळवे (२४, रा. प्रगती कॉलनी, घाटी) आणि सय्यद मुसहिक अली सय्यद सादत अली (२८, रा. हैदरबाग १, देगलूर नाका, नांदेड) यांना अटक केली होती.उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, ३० हजार रुपयांत एक लाखांच्या बनावट नोटा देणाºया रॅकेटमधील दिशांत साळवे आणि सय्यद मुसहिकला २४ जुलैला अटक केली होती. त्यावेळी आरोपींकडून ७ लाख १६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. पोलीस कोठडीत आरोपींची कसून चौकशी केली असता नोटा छापण्याचे काम आरोपी इम्रान खान करीम खान पठाण करीत असल्याचे समजले.मुसहिकच्या हैदराबादेतील सासुरवाडीजवळ एक खोली भाड्याने घेऊन तो तेथे नोटा छपाई करतो, अशी कबुली आरोपींनी दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि पथकाने हैदराबादेत जाऊन आरोपी इम्रानला बेड्या ठोकल्या.त्याच्या खोलीची झडती घेतली असता तेथे कलर प्रिंटर, कटर, कोरे पेपर, लॅपटॉप आणि १ लाख ७५ हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या. आरोपी इम्रानने वेब डिझाईनर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून दुबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत सात वर्षे नोकरी केली. तो मुसहिकचा मित्र आहे.भारतात परतल्यानंतर त्यांनी बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू केला. त्याने आतापर्र्यंत किती जणाला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दिल्या, याचा तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद शिंदे यांच्या मार्गदर्र्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, कर्मचारी प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष शिरसाट, डोभाळ हे करीत आहेत.लॅपटॉपमध्ये ख-या नोटा करायचे स्कॅनआरोपीकडे अत्यंत महागडा आणि उच्च दर्जाचा लॅपटॉप आहे. तो ख-या नोटा स्कॅन करून लॅपटॉपमध्ये त्याचा डाटा जमा करी. त्यानंतर तो कलर प्रिंटरच्या माध्यमातून नोटांची छपाई करी, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून आतापर्यंत ९ लाखांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
मास्टर माइंड इम्रानला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:02 AM