शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

महापालिकेच्या कारभारावरून अर्थमंत्र्यांसमोर महापौर, खासदारात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:08 PM

औरंगाबाद जिल्हा नियोजनावर चर्चा सुरू असताना राजकीय टोलेबाजीचा हा प्रकार घडला. 

ठळक मुद्देघोडेलेंनी दिले विरोधात उभे राहण्याचे ‘चॅलेंज’जलील म्हणाले: १५ जण मिळून चालवितात पालिका

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमचे खा.इम्तियाज जलील आणि महापौर नंदकुमार घोडेले यांच्यात अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोरच जुंपली. १५ जण मिळून महापालिकेचा कारभार चालवितात, असा आरोप खा.जलील यांनी केला. तर महापौर घोडेले यांनी त्या १५ जणांविरोधात मनपा निवडणुकीत उमेदवार द्या, असे आव्हान खा.जलील यांना दिले. या राजकीय सुंदोपसुंदीत अर्थमंत्री पवार यांनीही महापौरांना टोमणे मारले. 

गुरुवारी विभागीय आयुक्तालयात वित्त व नियोजन आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा नियोजनावर चर्चा सुरू असताना राजकीय टोलेबाजीचा हा प्रकार घडला. महापौर घोडेले यांनी अर्थमंत्र्यांकडे रस्त्यांसाठी निधी मागितला. त्यावेळी पवार म्हणाले, महापौर तुम्ही शहराचे प्रथम नागरिक आहात. मनपा वसुली करीत नाही. शासन किती मदत करणार मनपाला, तसेच वसुली, स्वच्छता, कचरा संकलन व इतर विकास कामांमध्ये मागे असल्यावरून त्यांनी मनपाचे कान टोचले. 

महाविकास आघाडीत शिवसेना मोठा घटक पक्ष असताना अर्थमंत्री पवार यांनी विरोधी पक्षांप्रमाणे महापौर घोडेले यांना वागणूक देत असल्याचे पाहून खा.जलील यांनीही संधी साधली. ते म्हणाले, १५ लोक मिळूनच पालिका चालवितात. त्यावर महापौर म्हणाले, आम्ही काम करतो म्हणून सतत निवडून येतो. यावर तुम्हाला निवडून देणाऱ्या नागरिकांचेही आभार मानावे लागतील, असा टोला पवारांनी महापौरांना लगावला. महापौर म्हणाले, इंधनावर लावलेला अधिभार शासनाने आम्हाला द्यावा, शासनाला निधी द्यायची भावना नसेल तर हक्काची रक्कम तरी द्या, असे अर्थमंत्र्यांना बोलून महापौर सभागृहाबाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर महापौर खा.जलील यांना म्हणाले, जर तुम्हाला रोखायचे असेल तर त्या १५ लोकांच्या विरोधात तुम्ही उमेदवार द्या. आम्हाला थांबवून दाखवा, हे माझे आव्हान आहे तुम्हाला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारImtiaz Jalilइम्तियाज जलील