साथरोग टाळण्यासाठी उपाययोजनाजालना : शहर परिसरात तापाची साथ पसरत आहे. साथरोग टाळण्यासाठी नगर पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांनीही साठविलेले पाणी झाकुन ठेवावे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस साजरा करावा असे आवाहन नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नापारखे यांनी केले.नगर पालिका हद्दीतील नागरिकांनी नळांना तोट्या लावून घ्याव्यात, त्यातून पाण्यचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गटारातील पाणी नळाद्वारे जलवाहिनीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. घरातील साठविलेल पाणी झाकुन ठेवावे. दर आठवड्यातून एकदा टाक्या कोरड्या कराव्यात. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून साजरा करावा. साथीचे रोग होवू नयेत म्हणून प्रयत्न करावेत, असे त्या म्हणाल्या. संपूर्ण शहरातील पालिकेद्वारे स्वच्छता राखली जावी म्हणून प्रयत्न होत आहेत. परंतु नागरिकांनी घरातील केरकचरा, प्लास्टीक कॅरी बॅग, नालित किंवा रस्त्यावर टाकू नयेत, जवळच्या कचराकुंडीतच कचरा टाकावा, तसेच लहान मुलांना शौचासाठी नालीवर किंवा उडघ्यावर बसवू नये. काचेच्या बाटल्या, जुने टायर किंवा अन्य टाकाऊ वस्तूंमधून पाणी साठवू नये. असे आवाहनही केले. दरम्यान, नगर पालिकेने धूर फवारणीची मागणी होत आहे.
साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना
By admin | Published: September 13, 2014 11:09 PM