औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या परिषदेसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय ५६ लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठविण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात १८ आमदारांनीच हजेरी लावली. त्यामुळे हक्काच्या पाण्यावरून लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याची चर्चा परिषदेत सुरूहोती.आ. प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने सोमवारी तापडिया नाट्यमंदिरात समन्यायी पाणी वाटप परिषद घेण्यात आली. नगर, नाशिक जिल्ह्यांतील नेत्यांच्या दबावामुळे जायकवाडीत ७ टीमसी पाणी येण्यापासून अडले आहे. हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेत्यांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी मराठवाड्यातील ५६ लोकप्रतिनिधींना निमंत्रणे पाठविली; परंतु केवळ १८ आमदारांनी हजेरी लावली. जे आमदार उपस्थित राहिले, त्यांनी पाण्यासाठी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला; परंतु आमदारांचे संख्याबळ आणखी असते तर सरकारवर मोठा दबाव निर्माण होऊ शकला असता, असा सूरही परिषदेत व्यक्त झाला.जिल्ह्यातील फुलंब्रीचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव, जालन्याचे आ. अर्जुन खोतकर, घनसावंगी आ. राजेश टोपे, भोकरदनचे आ. संतोष दानवे यांच्यासह बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार बैठकीस गैरहजर होते.खासदारही गैरहजरसर्वपक्षीय बैठकीला खासदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते; परंतु एकाही खासदाराने बैठकीला हजेरी लावली नाही. आ. सतीश चव्हाण यांनी मनोगतात याचा उल्लेखही केला. बैठकीसाठी ५६ लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले होते, असे आ. बंब यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरील बैठकीला ३८ लोकप्रतिनिधींची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 9:34 PM
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या परिषदेसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय ५६ लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठविण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात १८ आमदारांनीच हजेरी लावली.
ठळक मुद्दे फक्त १८ आमदारांची हजेरी : लोकप्रतिनिधींना पाणी प्रश्नाचे गांभीर्य किती?