शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

वाहनचालकांच्या खिशाला कात्री; थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागला, तुम्हाला फटका कितीचा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 6:57 PM

अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यासाठी महत्त्वपूर्ण

औरंगाबाद : सर्व वाहनांना थर्ड पार्टी विमा असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा विमा काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरते. या सगळ्यात आता वाहनांचा थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

थर्ड पार्टी विमा म्हणजे यात पहिला पक्ष हा वाहन मालक असतो. दुसरा पक्ष हा वाहन चालक आणि अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्ती तिसरा पक्ष समजला जातो. अपघातग्रस्तास नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी ही वाहन मालकावर असते. थर्ड पार्टी विमा काढलेला असल्यास ही भरपाई विमा कंपनी देते. १ जूनपासून थर्ड पार्टी विमा महागला आहे. मात्र, १५० सीसीपर्यंतच्या दुचाकीचा थर्ड पार्टी विमा स्वस्त झाला आहे.

ई-वाहनांना ७.५ टक्के सवलतइलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या वाहनांच्या इन्शुरन्सवरील प्रीमियमवर ७.५ टक्के सवलत दिली जाईल. ३ किलोवॅट क्षमतेच्या ई-स्कूटर्ससाठी पाच वर्षांचा सिंगल प्रीमियम २,४६६ रुपये निश्चित करण्यात आला आहे, तर ३ ते ७ किलोवॅट क्षमतेच्या ई-स्कूटर्ससाठी प्रीमियम ३,२७३ रुपये असेल. त्याचप्रमाणे ७ किलोवॅट ते १६ किलोवॅट क्षमतेच्या दुचाकींना पाच वर्षांसाठी ६,२६० रुपये प्रीमियम, तर १६ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना १२,८४९ रुपये प्रीमियम भरावा लागेल. सरकारने खाजगी ई-कारांसाठी थर्ड पार्टी विमा हप्तादेखील निश्चित केला आहे. आता ३० किलोवॅट क्षमतेच्या ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम ५,५४३ रुपये असेल. त्याचप्रमाणे, ३० किलोवॅट ते ६५ किलोवॅटमधील ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम ९,०४४ रुपये आकारला जाईल. ६५ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या ई-कारसाठी आता २०,९०७ रुपये तीन वर्षांचा प्रीमियम आकारला जाईल, असे विमा प्रतिनिधी अर्जुन नवगिरे यांनी सांगितले.

शहरात कोणती वाहने किती ?दुचाकी- १२,४०,०५०तीनचाकी-३६,२२६चारचाकी-१,०७,२५८डिलिव्हरी व्हॅन-३८,०९२

शहरात इलेक्ट्रिक वाहने किती ?दुचाकी-२६३०चारचाकी- ३०९तीनचाकी-२६

थर्ड पार्टी विमा किती ? (विना‘जीएसटी’)वाहनाचा प्रकार-आधी-१ जूननंतर१ हजार सीसीपर्यंतच्या कार-२०७२-२०९४१५०० सीपर्यंतच्या कार-३२२१-३४१६१५०० पेक्षा सीसीच्या कार-७८९०-७८९७१५० सीसीपर्यंतच्या दुचाकी-७५२-७१४१५० पेक्षा जास्त सीसीच्या दुचाकी -११९३-१३६६३५० सीसीपेक्षा जास्त सीसीच्या दुचाकी-२३२३-२८०४

विमा असणे बंधनकारकसर्व वाहनांना थर्ड पार्टी विमा असणे बंधनकारक आहे. ई-वाहनांना नोंदणीसाठी सवलत दिली जाते.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात