औरंगाबाद - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ३ उपकुलसचिवांसह ४५ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्याची माहीती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या लाेकांपेक्षा काम करणाऱ्यांची प्रशासनात गरज आहे. प्रशासनाला गतीमान करण्यासाठी मेगा बदल्या केल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.
प्रोग्रामर एल. एस पाटील, वाय. ए. साळवे, कक्षअधिकारी एच. एस. हिवराळे, बी. बी. वाघ, मिर मुश्ताक अली, आर.आर. चव्हाण, ए. ए. वडोदकर, वाय. एस. शिंदे, पी. एस.पडूळ, ए. यु. पाटील, व्हि. एस. खैरनार, ए. एस. ए. एच. महेसुलदार या वर्ग २ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या असून त्यांना तात्काळ रूजू होण्याचे आदेश कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी दिले आहे. ११ ऑक्टोबर रोजी रुजू झालेल्या कुलसचिवांनी महिन्याभरातच नवा भिडू नवा राज असल्याचे दाखवून दिले आहे. श्रेणी ३ मधिल ३० कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्याने शुक्रवारी एकुण ४५ जणांच्या बदल्या त्यांनी केल्या आहेत.
३ उपकुलसचिव, १ सहाय्यक कुलसचिवाचे विभाग बदललेशैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव आय. आर. मंझा यांच्याकडे पदव्युत्तर विभाग, नियोजन आणि संख्यांकी विभाग, पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव व्हि. एम. कऱ्हाळे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, लेखा विभागाचे उपकुलसचिव एस. एस. कवडे यांच्याकडे शैक्षणिक विभाग, तर स्थावर विभागाचे सहाय्यक कुलसचिव एम. जी. वागतकर यांच्याकडे लेखा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पदवी प्रमाणपत्रात आता ७ ऐवजी १२ सिक्योरिटी फीचर्सपदवी बनावट पद्धतीने तयार करू नये यासाठी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रामध्ये यापुर्वी सिक्योरिटीचे ७ फिचर होते, मात्र आता या पदवीमध्ये आणखी ५ फीचर्स टाकण्यात आल्याने पदवी प्रमाणपत्र आणखी सुरक्षित झाली आहे. पदवीमध्ये हाय रिझॉल्यूशन बॉर्डर, मायक्रो टेस्ट बॉर्डर, गोल्ड फॉइल्ड बॉर्डर, बारकोड, प्रिंटेड वॉटरमार्क, एमसीआर फॉन्टमधील युनिक सिरियल नंबर, प्रिंटेड बारकोड, ड्यूअर हीडन इमेज, इनव्हिजीबल युव्ही इंक, व्हीओआयडी फोटोग्राफ तसेच क्युआर कोड आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
गेटचे सुशोभिकरण जानेवारीपर्यंत होईल पूर्णविद्यापीठ गेटचे संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या कामाने गती घेतली आहे. सुरक्षा भिंती, बाजेचे दोन्ही रस्त्यांचे काम पुर्ण झाले असून सुरक्षा गेट आणि सुशोभिकरणाचे काम १४ जानेवारी विद्यापीठ नामविस्तार दिनापर्यंत पुर्ण होणे अपेक्षित असून शहिद स्मारकाच्या निविदेची प्रक्रीया पुढील काही दिवसांत पुर्ण होऊन कार्यादेश निघतील असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.
दंड तर व्याजासह भरावा लागणार...भाैतीक सुविधा नसल्याने २३ महाविद्यालयांवर कुलगुरूंनी दंडात्मक कारवाई केली होती. या महाविद्यालयांना सात दिवसांच्या आत दंड भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, महाविद्यालयांनी अद्याप पर्यंत दंड भरला नाही. त्या महाविद्यालयांना ७ टक्के व्याजासह दंड भारावाच लागेल. दंड भरत नाही, तोपर्यंत महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. तसेच ना हरकत प्रमाणपत्रही दिल्या जाणार नसल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवेले यांनी स्पष्ट केले.