शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विद्यापीठाचा ‘महिको’सोबत सामंजस्य करार; ‘पेटंट’सह विविध विषयांचे होणार अदान-प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:16 PM

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university News : या करारांतर्गत महिको व विद्यापीठात ‘बौद्धिक संपदा हक्क’ व संशोधन प्रकल्पाबाबत अदान-प्रदान करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व ‘महिको’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामाध्यमातून ‘बौद्धिक संपदा हक्क’ यासह विविध संशोधन प्रकल्पास गती मिळेल, असा विश्वास कुलगुुरु डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. ( Memorandum of Understanding between the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University and Mahyco) 

शुक्रवारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भालचंद्र वायकर, ‘डीएसटी-फिस्ट’ प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ. रत्नदीप देशमुख, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख हे तसेच ‘महिको’चे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. भारत आर. चर व वैज्ञानिक डॉ. स्मिता व्ही. कुरुप यांची उपस्थिती होती.

या करारांतर्गत महिको व विद्यापीठात ‘बौद्धिक संपदा हक्क’ व संशोधन प्रकल्पाबाबत अदान-प्रदान करण्यात येणार आहे. कपाशीवर पडणारे रोग तसेच ‘सॉईल ऑर्गेनिक कार्बन’ यासंबंधी उपग्रहाच्या माध्यमातून संशोधन करण्यात येणार आहे. ‘महिको’च्या उषा बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. आगामी तीन वर्षे या कराराची मुदत असणार आहे. विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आणि डॉ. रत्नदीप देशमुख, तर ‘महिको’च्या वतीने डॉ. भारत चर व डॉ. स्मिता कुरुप यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

संशोधन प्रकल्पास चालना मिळेलजालना हा ‘सीड हब’ म्हणून ओळखला जात असून विद्यापीठ कार्यक्षेत्रात हा जिल्हा येतो. त्यामुळे संगणकशास्त्र विभागातील ‘डीएसटी फिस्ट’ प्रकल्पांतर्गत झालेला हा करार संशोधन प्रकल्प आणि ‘पेटंट’साठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास कुलगुरु डॉ. येवले यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, करारासाठी विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. चर यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद