औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वार्धक्यशास्त्र विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे घाटीत ओपीडी-१४२ मध्ये ‘मेमरी क्लिनिक ’ सुरू करण्यात येत आहे.
वाढत्या वयाने मेंदूतील रक्तपेशी कमकुवत होतात. रक्तपुरवठा कमी होतो. परिमाणी, विसराळूपणा वाढतो. स्वभावातही बदल होतो. एका हद्दीपर्यंत हे सामान्य असते. थोडाफार विसराळूपणाही ठीक असतो; परंतु हे अति होते, तेव्हा घरच्या लोकांना न ओळखणे, स्वत:चे नावही न आठवणे असा सतत प्रकार होतो. या सगळ्या बाबींचे वेळीच निदान करून रुग्णाला मदत करणे आणि रुग्णाला सांभाळण्यासंदर्भात कुटुंबाला प्रशिक्षण यादृष्टीने ‘मेमरी क्लिनिक’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
ओपीडी-१४२ येथे दररोज दुपारी १२ ते १ आणि बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही सेवा मिळणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्या मंजुरीने हे क्लिनिक सुरू होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलजा राव, मानसोपचार विभागप्रमुख डॉ. संजय घुगे, आरोग्य विभागाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमित टाक आदी यासाठी प्रयत्नशील आहेत. वयोमानामुळे वाढणाऱ्या विसराळूपणाचे निदान आणि उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या ‘मेमरी क्लिनिक ’चे शुक्रवारी सकाळी ११ वाजता उद््घाटन होणार आहे.
उपलब्ध निधीतून उपक्रमजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, एमडी-वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विषयात पदव्युत्तर या अभ्यासक्रमाची मंजुरी मिळविणारे घाटी रुग्णालय राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. पायाभूत सुविधांनी हा विभाग सज्ज आहे. उपलब्ध निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वा अधिक चांगली वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर म्हणाल्या, वार्धक्यशास्त्रच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘एमसीआय’च्या मानांकनानुसार मेमरी क्लिनिकची गरज असते. छोट्या स्तरावर हे काम सुरू होते. आता जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबर ही सेवा अधिक चांगली आणि मोठ्या स्तरावर होईल.