शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

शहरात मेफेड्रोनची छुप्या पद्धतीने विक्री; तस्कराला पोलिसांनी भल्या पहाटे घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 7:06 PM

रेल्वेस्टेशन रस्त्यावरील कर्णपुरा मैदान येथे एक जण मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या पथकाची कारवाई 

औरंगाबाद : मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रेल्वेस्टेशन रस्त्यावरील कर्णपुरा मैदानावर गुरूवारी भल्या पहाटे ३ वाजता सापळा रचून पकडले. यावेळी आरोपीकडून २६ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन पावडर, ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ४५० रुपयांची रोकड जप्त केली. जुनैद खान जावेद खान(२५,रा.बारी कॉलनी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काही दिवसांपासून शहरात मेफेड्रोन या अंमली पदार्थाची नशा केली जात आहे. यामुळे काही जण चोरट्या मार्गाने सर्रास नशेखोरांना मेफेड्रोन पुरवित असतात. पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने गेल्या काही महिन्यांत मेफेड्रोन तस्करांवर कारवाई केली. या कारवाईनंतरही शहरात मेफेड्रोनची विक्री छुप्या मार्गाने सुरूच असल्याचे समोर आले. रेल्वेस्टेशन रस्त्यावरील कर्णपुरा मैदान येथे एक जण मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली.

यानंतर सहायक निरीक्षक रोडे, कर्मचारी सय्यद शकील, इमरान पठाण, ए. आर. खरात, एम.बी.विखनकर, विजय निकम, विठ्ठल आडे, चालक व्ही.एस.पवार, छायाचित्रकार चौधरी, फॉरेन्सिक विभागाचे निरीक्षक वैभव घाडगे, माधुरी खरात यांच्या पथकाने २ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कर्णपुरा मैदानावर सापळा रचला. संशयित तरुण तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडले. तेव्हा पंचासमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी प्लास्टिकच्या लहान पिशव्यांमध्ये २६ हजार रुपये किमतीचे ६.७३ ग्रॅम मेफेड्रोन, मोबाईल आणि रोख ४५० रुपये रोख असा एकूण १ लाख १६ हजार ४५० रुपयांचा ऐवज आढळला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद