जालना: यंदा पडलेल्या समाधानकरक पावसानंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. शनिवारी पारा ३९ अंशांवर गेल्याने कडक उन्हामुळे अबालवृद्धांचे हाल झाले. उकाडा वाढला होता. रस्त्यावर सायंकाळपर्यंत शुकशुकाट दिसून आला.फेब्रुवारी महिन्यापासून यंदा ऊन चटकायला सुरूवात झाली होती. फेब्रुवारी महिन्यातच पारा ३५ अंशांवर गेले होते. शनिवारी या तापमानात वाढ होऊन ते ३९ अंशांवर गेले. तापमान ३९ अंश असले तरी याची तीव्रता ४४ अंशांप्रमाणे जाणवत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या आठवड्यात तापमान ४२ अंशांपर्यंत वाढू शकते असा अंदाजहही कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कडक उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकट दिसून आला. शहरातील गजबजलेल्या चौकांत वर्दळ एकदम रोडावली होती. बसस्थानक व रेल्वेस्थानकातही प्रवासी कमी दिसून आले. उन्हापासून बचाव करण्यासाठी बहुतांश नागरिकांच्या डोक्याला रूमाल तसेच टोपी दिसून आली.
जालन्याचा पारा ३९ अंशांवर
By admin | Published: March 25, 2017 11:33 PM