सईद अहमद ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रत्येक व्यक्तीने आयुष्यभर ‘नेकी’च्या मार्गावर चालण्याचे काम करावे. यातून आपले जगातील आयुष्य सुकर होईल. ‘आखिरत’ची तयारीही आत्ताच होईल. अल्लाहने दिलेल्या शिकवणीनुसारच आपले आयुष्य जगावे, असा सल्लाही आमखास मैदानावर आयोजित एकदिवसीय सुन्नी इज्तेमामध्ये देण्यात आला.दावत-ए-इस्लामीतर्फे शुक्रवारी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत एकदिवसीय सुन्नी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या इज्तेमासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. शुक्रवारची विशेष नमाजही याठिकाणी अदा करण्यात आली. यानंतर रात्री उशिरापर्यंत नागरिकांना वेगवेगळ्या धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले.मुंबईहून आलेले मौलाना मुफ्ती याहया यांनी अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीवर भाष्य केले. वेगवेगळी उदाहरणे देत त्यांनी समाजप्रबोधन केले. पुण्याचे अकबर रजा यांनी ‘दरूद शरीफ’चे सतत पठण करीत राहावे, असा उपदेश केला. त्याचे फायदेही त्यांनी नमूद केले.समाजातील वाईट प्रथांवरही यावेळी प्रहार करण्यात आला. ‘इस्लामी तालीम’वर भर द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अंमल करावा. त्यांच्या काळात घडलेली अनेक उदाहरणेही त्यांनी यावेळी दिली. मुलींनाही शिक्षण द्यावे, महिलांचा आदर करावा, अशा सूचना करण्यात आल्या. सायंकाळी ५.१५ वाजता ‘असर’ची नमाज अदा करण्यात आली. त्यापूर्वी दावत-ए-इस्लामीतर्फे सुरू असलेल्या अनेक धार्मिक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. यानंतर विशेष दुआ करण्यात आली. दावत-ए-इस्लामीचे सूफियानभाई, अब्दुल मतीन, हाजी अली, इब्राहिमभाई यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान दिले.
आयुष्यभर ‘नेकी’ची कामे करण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:15 AM
प्रत्येक व्यक्तीने आयुष्यभर ‘नेकी’च्या मार्गावर चालण्याचे काम करावे. यातून आपले जगातील आयुष्य सुकर होईल. ‘आखिरत’ची तयारीही आत्ताच होईल. अल्लाहने दिलेल्या शिकवणीनुसारच आपले आयुष्य जगावे, असा सल्लाही आमखास मैदानावर आयोजित एकदिवसीय सुन्नी इज्तेमामध्ये देण्यात आला.
ठळक मुद्देसुन्नी इज्तेमा : औरंगाबादच्या आमखास मैदानावर अलोट गर्दी; राज्यभरातून आलेल्या धर्मगुरूंचे भाविकांना सविस्तर मार्गदर्शन