कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मसिआच्या वतीने ऑनलाईन अध्यक्ष अभय हंचनाळ यांच्या अध्यक्षतेखाली अर्धवार्षिक सभेचे गुरुवार (दि.२६) आयोजन करण्यात आले होते. या सभेत हंचनाळ यांनी कनेक्ट प्रोग्रॅमची माहिती देऊन मसिआतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. सभेत औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांविषयी लघु उद्योजकांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता व पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासोबत चर्चा झाल्याचे अध्यक्ष हंचनाळ यांनी सांगितले. पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार खाजगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने लघु उद्योजकांनी उद्योगनगरीतील एल, सी व एच या सेक्टरमध्ये रात्रीची गस्त सुरू केल्याचे सांगितले. या सभेत सचिव राहुल मोगले यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. याप्रसंगी राजेंद्र चौधरी, सहसंपादक राजेश मानधनी, पृथ्वीराज शाह, विजय लेकुरवाळे, सुनील किर्दक, किरण जगताप, नारायण पवार, अब्दुल शेख, विकास पाटील, बसवराज मोरखंडे, राजेंद्र चौधरी, गजानन देशमुख, अनिल पाटील, सर्जेराव साळुंके, अर्जुन गायकवाड, भीमराव काडावकर, संदीप जोशी आदी उपस्थित होते.
मसिआची ऑनलाईन सभा
By | Published: December 02, 2020 4:09 AM