शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मेट्रो सिटीचा ‘कार-ओ-बार’ ट्रेंड छत्रपती संभाजीनगरात, गाड्यांमध्येच दारू रिचवून वाढतोय वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 19:38 IST

छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी मद्यपींची कारमध्येच ‘बैठक’; वेगासोबत अपघातांचा आलेख वाढता

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन आठवड्यांमध्ये ‘हिट अँड रन’च्या सलग चार घटनांनी सामान्यांच्या मनात धडकी भरली आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी सुसाट गाड्या पळवणाऱ्यांपासून भविष्यात गंभीर नुकसान होऊ शकते. यास शहरात वाढत असलेला ‘कार-ओ-बार’ ट्रेंड कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. बार, रेस्टॉरंटपेक्षा कारमध्ये बसून दारू पिण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्यावर कारवाई किंवा नियंत्रण ठेवायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एपीआय कॉर्नरला मद्यधुंद कारचालकाने रविवारी दुपारी तीन गाड्यांना ठोकले. आठ दिवसांमध्ये ‘हिट ॲण्ड रन’ची तिसरी घटना असताना सोमवारी सायंकाळी सुसाट स्कॉर्पिओ चालक होलिक्रॉस स्कूल ते नगर नाक्यापर्यंत ५ वाहनांना उडवत गेला. एकीकडे बेजबाबदार वाहनचालकांची संख्या वाढत असतानाच भरदिवसा दारू रिचवून गाड्या पळवण्याचे प्रमाणही वाढत आहेत. अपघातातील बहुतांश वाहनांत दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे उघड्यावरच भरणाऱ्या ‘मद्यपींच्या बैठकां’चा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

काय आहे ‘कार-ओ-बार’ ट्रेंड ?कारमध्येच बसून दारू पिण्याला तरुणांमध्ये ‘कार-ओ-बार’ म्हटले जाते. तरुणांसह आता ३५ ते ६० वयोगटातील अनेक मद्यपी रात्री रस्त्याच्या कडेला, ढाब्याबाहेर, निर्मनुष्य परिसर, औद्योगिक वसाहतींमध्ये कार उभी करतात. कारमध्ये किंवा कारवर ग्लास ठेवून बैठका रंगवल्या जातात. अनेकदा बारमधील वाढीव दर नको म्हणून मद्यपी हा मार्ग अवलंबतात. शिवाय, अल्पवयीनांना बारमध्ये प्रवेश निषिद्ध असल्याने अनेक अल्पवयीन हाच ट्रेंड फॉलो करतात.

या भागात वाढले प्रकारशहरात रामगिरी ते सिडको चौक, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहत, केंब्रिज चौक, बीड बायपास, झाल्टा फाटा, उड्डाणपुलाखालील जागा, सोलापूर-धुळे महामार्ग, पैठण रोड ते लिंक रोड, सर्व्हिस रोडवरवर सर्वाधिक मद्यपींच्या कार उभ्या आढळून येतात. अनेक ठिकाणी वाईन शॉपच्याच आजूबाजूला कार उभ्या करून दारू रिचवली जाते.

हे बेकायदेशीरचभारतीय कायद्यानुसार रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई असल्याने कारमध्ये दारू सेवनही बेकायदेशीर मानले जाते. अशांना न्यायालयात हजर करून दंड ठोठावण्यात येतो. यात वाहन देखील जप्त केले जाते.

१६४ जणांवर कारवाईवाहतूक विभागाच्या माहितीनुसार, गेल्या ८ महिन्यांत १६४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली. यात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १०७ वाहनचालकांना रंगेहाथ पकडले.

वेगासोबत अपघातांचा आलेख वाढतामहिना अपघात मृत्यू गंभीर जखमीजानेवारी ४४ १४ ३७फेब्रुवारी ४५ १७ २९मार्च ५१ १९ ४३एप्रिल ४९ १५             २५मे ४८ १६             ४२जून ४२ १४ २४जुलै ५५ ११ ५१ऑगस्ट ५७ १९ ४३

अवघ्या २१८ जणांवर वाहतूक विभागाची जबाबदारीशहराची लोकसंख्या १६ लाख तर वाहने १३ लाखांच्या घरात आहेत. वाहतूक नियमाची जबाबदारी मात्र अवघ्या २१८ अंमलदारांवर आहे. यापैकी काही रजेवर गेल्यावर १७० जणांवरच जबाबदारी येऊन ठेपते. त्यामुळे नियमन करावे की कारवाया, असा प्रश्नही वाहतूक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात