औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन (एमजीएम) कॅम्पसमधील मुलींच्या वसतिगृहात राहणाºया २२ वर्षीय डॉक्टर विद्यार्थिनीचा तिच्या रूममध्ये घुसून गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्र्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. यामुळे खळबळ उडाली असून, या घटनेचा तपास सिडको पोलिसांनी सुरू केला.डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (रा. झेंडा चौक, पाटील गल्ली, माजलगाव, जि. बीड) असे खून झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकांक्षा एमजीएमच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स आॅफ फिजिओथेरपी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होती.सिडको पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकांक्षा ही एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहातील चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ३३४ मध्ये दोन विद्यार्थिनीसोबत राहत होती. तिच्या रूम पार्टनर तंत्रनिकेतन आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी असून, त्यांची परीक्षा नुकतीच झाल्याने त्या गावी गेल्या होत्या. त्यामुळे तीन दिवसांपासून आकांक्षा वसतिगृहात एकटीच होती. सोमवारी (दि.१०) रात्री आकांक्षाने तिची हजेरी नोंदविली होती. दुसºया दिवशी (दि.११) सकाळी ९ वाजता ती हजेरीसाठी वॉर्डनच्या कक्षात आली नव्हती. शिवाय दिवसभर कोणीही तिला पाहिले नाही. मंजिरी जगताप या रात्रपाळीच्या वसतिगृह सहप्रमुख (वॉर्डन) होत्या. त्यांनी रात्री ९ वाजता हजेरी घेतली तेव्हा आकांक्षा न दिसल्याने जगताप लगेच एका मुलीला सोबत घेऊन आकांक्षाच्या खोलीत गेल्या. त्यावेळी त्यांना आकांक्षा खोलीत निपचित पडलेली दिसली. तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या. बाजूला टेबल आडवा पडलेला आणि आरसा खाली पडलेला होता. आरसा आणि टेबलच्या मध्ये आकांक्षा पडलेली होती. शिवाय तिचा स्टोल (दुपट्टा) तेथे खाली पडलेला होता. त्यांनी या घटनेची माहिती लगेच आकांक्षाचा चुलतभाऊ, एमजीएम नर्सिंगमधील प्रा. डॉ. राहुल देशमुख आणि वसतिगृह प्रमुख प्रेरणा दळवी यांना कळविली. जगताप यांनी तोपर्यंत डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्सला बोलावून घेतले. दळवी, डॉ. राहुल हे रूमवर पोहोचले. त्यांनी लगेच आकांक्षाला एमजीएम अपघात विभागात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी रात्री साडेदहा वाजता आकांक्षाला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती माजलगाव येथे राहणाºया तिच्या आई-वडिलांना आणि सिडको पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.शवविच्छेदन अहवालानुसार गळा दाबल्याने मृत्यूघाटी रुग्णालयात बुधवारी सकाळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या देखरेखीखाली आकांक्षाचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने आकांक्षाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. तिच्या रूममध्ये आडवा पडलेला टेबल आणि आरसा, तसेच दुपट्टा यावरून तिचा कोणीतरी गळा दाबून खून केला असावा, या निष्कर्षापर्यंत पोलीस अधिकारी पोहोचले.मुलींच्या वसतिगृहात पुरुषाला प्रवेश नाहीया वसतिगृहात सुमारे साडेचारशे मुली राहतात. मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेसाठी प्रेरणा दळवी या मुख्य वॉर्डन आहेत तर त्यांच्या मदतीसाठी सहा सहवॉर्डन महिला काम पाहतात. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तेथे प्रवेश नसतो. वसतिगृहात राहणाºया मुलींच्या नातेवाईकांनाही रूममध्ये प्रवेश दिला जात नाही. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या या वसतिगृहात आकांक्षाचा गळा दाबून कोणी खून केला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला.वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची घटनास्थळी धावघटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक वामन बेले, सिडको ठाण्याच्या डी. बी. पथकाचे उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक सायन्सच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.तपास अधिकाºयांना पूर्ण सहकार्यआकांक्षाच्या मृत्यूचे आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे. ही घटना नेमकी कशी झाली, याचा तपास पोलिसांनी करावा. पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करीत आहोत.- प्रेरणा दळवी, वसतिगृह प्रमुख.खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करणारपोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे म्हणाले की, डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार आकांक्षाचा गळा दाबल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे हा खुनाचाच प्रकार असल्याने याप्रकरणी सरकार पक्षातर्फे खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे. - डॉ.राहुल खाडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -२
चोख सुरक्षेतील एमजीएम मुलींच्या वसतिगृहात डॉक्टर विद्यार्थिनीचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:22 AM
महात्मा गांधी मिशन (एमजीएम) कॅम्पसमधील मुलींच्या वसतिगृहात राहणाºया २२ वर्षीय डॉक्टर विद्यार्थिनीचा तिच्या रूममध्ये घुसून गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्र्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.
ठळक मुद्दे गळफास घेतल्याची प्रथम माहिती : शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाला, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव, कडक सुरक्षा व्यवस्था तरीही...