राज्य शासनाने सन २०१९ मध्ये ‘एमजीएम’ स्वयंअर्थसहायित विद्यापीठाचा दर्जा बहाल केला. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. सुधीर गव्हाणे यांनी काम पाहिले. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे डॉ. विलास सपकाळ यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सपकाळ यांनी मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंग या विषयात एम.टेक. व पीएच.डी. पदवी घेतली. ते ३२ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत असून, सन २०१० ते २०१४ या काळात ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कार्यरत होते. याशिवाय त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरही काम केले आहे.
सोमवारी झालेल्या या समारंभास ‘एमजीएम’चे कुलपती अंकुशराव कदम, गांधी विचाराचे अभ्यासक प्रा. मार्क लिंडले, उद्योजक रणजीत कक्कड, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, परीक्षा नियंत्रक कर्नल डॉ. प्रदीपकुमार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख उपस्थित होते.
फोटो कॅप्शन:
एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विलास सपकाळ यांना नियुक्तीपत्र देताना कुलपती अंकुशराव कदम. सोबत मावळते कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे.