शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

‘एमएच-५७’:वैजापूरची राज्यात आता नवी ओळख, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 1:14 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिसाला, शहरातील चकरा थांबणार

छत्रपती संभाजीनगर : तब्बल १८ लाखांवर वाहन संख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास सोमवारी शासन निर्णयद्वारे मान्यता देण्यात आली. ‘एमएच-५७’ अशी नवीन ओळख वैजापूरची आता राज्यभर असणार आहे. या नव्या कार्यालयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिलासा मिळणार असून, वाहनासंबंधी कामकाजासाठी शहरात माराव्या लागणाऱ्या चकरा थांबणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत बीड आणि जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. यात आता वैजापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील वाहनधारकांना लायसन्स काढायचे असो की अन्य काही कामकाज, त्यासाठी थेट शहर गाठावे लागते. परंतु, आता वैजापूरच्या माध्यमातून ग्रामीण भागातच वाहनासंबंधी कामकाजाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमएच-५७’ या नोंदणी क्रमांकासह वैजापूर येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे कार्यालय सुरू करण्यास सोमवारी मान्यता देण्यात आली. या कार्यालयासाठी शासकीय अथवा खाजगी मालकीची जागा भाडेतत्त्वार घेण्याची प्रक्रिया परिवहन आयुक्त कार्यालयाकडून केली जाणार आहे. तसेच एका इंटरसेप्टर वाहनासही मंजुरी देण्यात आली आहे.

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष‘लोकमत’ने ‘पीपल्स मॅनिफेस्टो’च्या माध्यमातून जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय का नाही, याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात २२ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. राज्यात लातूर, जळगाव याठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात येत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये या कार्यालयाची प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे समोर आणले. अखेर छत्रपती संभाजीनगरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळाले आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर