शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

मध्यान्ह भोजन घोटाळा राजस्थानात; ईडीचे छापे छत्रपती संभाजीनगरात

By सुमित डोळे | Published: September 27, 2023 11:31 AM

सप्टेंबर २०२२ मध्ये आयटीच्या पडल्या होत्या धाडी; मंगळवारी व्यावसायिकाच्या घरी ईडीचा छापा, दोन तास चौकशी

छत्रपती संभाजीनगर : राजकीय पक्षाची संबंधित शहरातील बडे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदारांच्या घरी ईडीने मंगळवारी छापा टाकत दोन तास चौकशी केली. २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात मध्यान्ह घोटाळ्याशी संबंधित याच व्यावसायिकावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मंगळवारच्या छापेमारीत याच व्यावसायिकाची चौकशी झाल्याची चर्चा होती. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कडून मात्र रात्री उशिरापर्यंत याला कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. मात्र, राजकीय क्षेत्रात याची जोरदार चर्चा सुरू होती.

मंगळवारी सकाळी २ वाहनांतून ईडीचे अधिकारी, कर्मचारी शहरात दाखल झाले होते. मछली खडक व ज्योतीनगरमध्ये त्यांनी छापेमारी केली. यात प्रामुख्याने व्यावसायिकाच्या एजन्सीच्या कार्यालयावर पथक बराच वेळ तपासणी करत होते. त्यानंतर व्यावसायिकाच्या औषधी एजन्सीवरदेखील पथकाने जाऊन तपासणी केली. या औषधी एजन्सीद्वारे राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयाला औषधांचा पुरवठा होतो. त्याच एजन्सीच्या बड्या दुकानातही हे पथक गेल्याची चर्चा होती.

महिना सप्टेंबरच, घोटाळा जुना की नवा?मंगळवारी पडलेल्या छाप्यात नाव समाेर येत असलेल्या व्यावसायिकावरच सप्टेंबर २०२२ मध्येच आयकर विभागाने छापा टाकत चौकशी केली होती. राजस्थानच्या मध्यान्ह भोजन घोटाळा प्रकरणात ती कारवाई करण्यात आली होती. राजस्थानच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरवण्याच्या योजनेला सदर व्यावसायिक धान्यपुरवठा करत होता, असेही त्यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई जुन्या घोटाळ्यासंदर्भात आहे की काही नवीन प्रकरणासाठी, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार