शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

सहा वर्षांचा थकीत जीएसटी भरा, ७५४ उद्योजकांना एमआयडीसीच्या पुन्हा नोटिसा

By बापू सोळुंके | Published: December 15, 2023 7:32 PM

सहा महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना दिल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर : मागील सहा वर्षांचा प्रलंबित वस्तू व सेवा कर(जीएसटी) तातडीने भरा, अशा नोटिसा छत्रपती संभाजीनगरमधील ७५४ उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाठविण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना दिल्या होत्या. मात्र, या नोटिसांना उद्योजकांनी गांभीर्याने न घेतल्याने आता पुन्हा नोटिसा पाठविण्यात आल्याने उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

‘एक देश, एक कर’ या करप्रणालीनुसार १ जुलै २०१७ पासून संपूर्ण देशात वस्तू व सेवा कर(जीएसटी) लागू करण्यात आला. या कराच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध सेवांची यादीही सोबत जोडली होती. यामध्ये एमआयडीसीकडून उद्योजकांना देण्यात येणाऱ्या सेवांवरही जीएसटी लागू करण्यात आला होता. ही बाब एमआयडीसीच्या लक्षात न आल्याने सन २०१७ ते २०२२ या कालावधीत विना जीएसटी एमआयडीसी उद्योजकांना सेवा देत होती. दरम्यान, ही बाब जीएसटी दक्षता पथकाच्या तपासणीदरम्यान निदर्शनास आल्यानंतर उद्योजकांकडे प्रलंबित राहिलेली जीएसटी तात्काळ वसूल करावा, असे निर्देश महामंडळाने एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले. एमआयडीसीने जेव्हाच्या तेव्हा आमच्याकडून जीएसटी वसूल करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ती वसुली केली नाही, त्यांची चूक आम्ही उद्योजकांनी का सहन करावी, अशी भूमिका घेत उद्योजकांनी एमआयडीसीच्या नोटिसांना प्रतिसाद दिला नाही. ज्या उद्योजकांचे एमआयडीसीकडे काम पडले, त्या उद्योजकांकडून थकीत जीएसटी वसूल करण्यात येत आहे. मात्र, आता पुन्हा वरिष्ठ कार्यालयांकडून जीएसटी वसुलीबाबत विचारणा झाल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी उद्योजकांना दुसऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

व्यवहारांसाठी नोटिसासन २०१७ ते २०२२ या कालावधीतील एमआयडीसीकडून कोणत्याही सुविधा घेतलेल्या अथवा कोणत्याही व्यवहारांवर जीएसटी अदा न केलेल्या प्रत्येक उद्योजकांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात भूखंड खरेदी, विक्री, बांधकाम परवानगी, नवीन नळजोडणी, ड्रेनेजलाइनजोडणी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, भूखंडाचा वापर बदलण्यासाठी घेतलेली परवानगी आदींचा यात समावेश आहे.

एमआयडीसीचे नाव आणि नोटिसांची संख्याचिकलठाणा एमआयडीसी- ५७८शेंद्रा एमआयडीसी- ९१वाळूज एमआयडीसी- ८५

जीएसटी न भरल्यास १८ टक्के व्याजाचा भुर्दंडजीएसटीच्या नियमानुसार मुदतीत जीएसटी न भरल्यास संबंधितांना त्यावर १८ टक्के दराने व्याज द्यावे लागते. ही बाब उद्याेजकांनी लक्षात घ्यावी आणि त्यांच्याकडे सन २०१७ ते २०२२ या कालावधीत थकीत जीएसटीची रक्कम तातडीने एमआयडीसीकडे जमा करावी.-चेतनकुमार गिरासे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

नोटीस देणे योग्य नाहीएमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जर मागील सहा वर्षे जीएसटी वसूल करण्यात आला नसेल, तर त्याचा भुर्दंड उद्योजकांनी का सोसावा. उद्योजकांच्या अनुदानाची कोट्यवधी रक्कम शासनाकडे बाकी आहे, ते देत नाही आणि आता मागील कराच्या वसुलीसाठी उद्योजकांना नोटिसा देणे योग्य नाही.-दुष्यंत पाटील, अध्यक्ष, सीएमआयए

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGSTजीएसटीMIDCएमआयडीसी