शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

एमआयडीसीचे पाणी रोखले

By admin | Published: December 14, 2015 11:53 PM

ढाकेफळ, वाळूज महानगर : गोदावरी काठावरील गावांचा वीजपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी ब्रह्मगव्हाण येथील

ढाकेफळ, वाळूज महानगर : गोदावरी काठावरील गावांचा वीजपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसला टाळे ठोकून वाळूज औद्योगिक वसाहतीला होणारा पाणीपुरवठा रोखला. दिवसभर पाणी न आल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली, तर वाळूज परिसरातील ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल झाले. ऊर्ध्व भागातील धरणांतून जायकवाडीत १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सोडलेल्या पाण्यापैकी ६.६३ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले. जायकवाडीत सोडलेले पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार असल्याने त्याचा उपसा टाळण्यासाठी गोदाकाठावरील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतवस्तीवरील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. या गावांतील दिवाळीही यामुळे अंधारात गेली होती. वीजपुरवठा बंद असल्याने पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण जात होते. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. पाण्याअभावी मनुष्य व जनावरांची होणारी आबाळ थांबावी, यासाठी ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसला टाळे ठोकण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संयमाचा बांध फुटलाअन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजीराव सूर्यवंशी, कृष्णा पा. डोणगावकर, रमेश जाधव, डॉ. बबन जाधव, काकासाहेब काळे, नारायण जगदाळे, बाबासाहेब घुले, श्रीमंत जगदाळे, किशोर शिरवत, दिलीप जगताप, बाबूराव केकते, सुरेश कदम, राजेश रंधे, संजय साबळे, कडूबाळ जगताप, लक्ष्मण गायकवाड, मनोहर शेतकऱ्यांनी पंपहाऊसचा ताबा घेऊन पाणीपुरवठा बंद केल्याचे समजल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. बिडकीन व पैठण एमआयडीसी पोलिसांनी पंपहाऊसकडे धाव घेतली. पैठणचे नायब तहसीलदार नामदेव देशटवाड, ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकऱ्यांनी दाद दिली नाही. ४खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरूकरण्याचे लेखी आश्वासन स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय माघार घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी सहापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पाटबंधारे विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी आला नाही. अखेर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.