शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मिलिंद पाटीलने ६१ चेंडूंत ठोकल्या नाबाद १0२ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:57 AM

औरंगाबादचा शैलीदार सिनिअर फलंदाज मिलिंद पाटील याने केलेल्या दणकेबाज शतकी खेळीच्या बळावर कम्बाईन बँकर्सने स्कोडा संघावर ९ गडी राखून मात केली. अन्य लढतीत एमआयटी रुग्णालयाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर १११ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : कम्बाईन बँकर्स, एमआयटी विजयी

औरंगाबाद : औरंगाबादचा शैलीदार सिनिअर फलंदाज मिलिंद पाटील याने केलेल्या दणकेबाज शतकी खेळीच्या बळावर कम्बाईन बँकर्सने स्कोडा संघावर ९ गडी राखून मात केली. अन्य लढतीत एमआयटी रुग्णालयाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर १११ धावांनी दणदणीत विजय मिळवला.गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी कम्बाईन बँकर्सविरुद्ध स्कोडा संघाने २0 षटकांत ८ बाद १५८ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून विपुल भोंडे याने ३२ चेंडूंतच ६ चौकारांसह ४२ धावा ठोकल्या. विजय मेहेत्रेने २ चौकार व एका षटकारासह ३३, अभिजित भगतने २३ धावा केल्या. कम्बाईन बँकर्सकडून निखिल मुरूमकर याने ३२ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात औरंगाबादचा सिनिअर फलंदाज मिलिंद पाटील याने चौफेर टोलेबाजी करताना अवघ्या ६१ चेंडूंतच ५ टोलेजंग षटकार व ९ खणखणीत चौकारांसह ठोकलेल्या नाबाद १0२ धावांच्या खेळीच्या बळावर कम्बाईन बँकर्सने विजयी लक्ष्य १६.३ षटकांत फक्त १ गडी गमावून सहज गाठले. राजेश कीर्तिकरने २१ व गौरव गंगाखेडकरने नाबाद २0 धावा केल्या. स्कोडाकडून विजय मेहेत्रेने १ गडी बाद केला.तत्पूर्वी, सकाळच्या लढतीत अमोल इंगळेने ४ चौकार व एका षटकारासह फटकावलेल्या ५२ धावांच्या बळावर एमआयटी रुग्णालयाने ८ बाद १७५ धावा फटकावल्या. आकाश लोखंडेने ३१, साईनाथ डहाळेने २७ व केदार काळेने २५ धावा केल्या. जॉन्सन अँड जॉन्सनकडून सचिन सबनीस व एकनाथ बांगर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सन संघ ९ बाद ६४ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून अथर्व पुजारीने सर्वाधिक २१ धावा केल्या. एमआयटीकडून साईनाथ डहाळेने १७ धावांत ४ व एस. कोट्टेवार याने ३ गडी बाद केले.