शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दूध उत्पादक संघ नफ्यात

By admin | Published: September 08, 2015 12:15 AM

औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अधिमंडळाची २०१४-१५ या आर्थिक वर्षाची सभा आज पाटीदार भवनात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अधिमंडळाची २०१४-१५ या आर्थिक वर्षाची सभा आज पाटीदार भवनात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दूध संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे अध्यक्षस्थानी होते. २०१०-११ पासून दूध उत्पादक संघ सतत वाढत्या नफ्यात आहे. यंदाचा नफा ९२ लाखांवर जाऊन पोहोचला आहे. दूध उत्पादकांना प्रतिलिटर ४० पैसे भावफरक देण्यात येणार आहे. ही रक्कम एक कोटी पाच लाख रु. इतकी होते. तसेच चारा बियाणास ५० टक्के सबसिडी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. दुष्काळी परिस्थिती पाहता दूध संघाच्या संचालकांनी एक वर्षभर भत्ते न घेण्याचेही ठरविले आहे. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दहा हजारांची मदत करण्याचे ठरविण्यात आले. दूध उत्पादक संघाच्या १४२ कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. संघाच्या कारकीर्दीत ही घटना प्रथमत:च घडल्याने कर्मचारीवर्ग खुश झाला आहे. दूध पुरवठा करणाऱ्या चांगल्या संस्थांचा व दूध विक्रेत्यांचा यावेळी रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. दूध उत्पादक संघाला सहकारभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व आयएसओ दर्जा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सुमारे दोन हजार जणांची यावेळी उपस्थिती होती. उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी आभार मानले. कचरूडिके, राजेंद्र जैस्वाल, गोकुळसिंग राजपूत, राजेंद्र पाथ्रीकर, दिलीप निरफळे, कुशीवर्ताबाई बडक, शीलाताई कोळगे, हिराबाई सोटम, सविता अधाने, पुंडलिक काजे, प्रभाकर सुरडकर, माजी संचालक रमेश डोणगावकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील, काकासाहेब कोळगे आदींची उपस्थिती होती.