शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

केळी लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:31 AM

इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़इसापूर धरण क्षेत्र परिसरात पाऊस न झाल्याने यंदा पहिल्यांदाच १२ टक्के जलसाठा झाला आहे़ सदर धरणावर अवलंबून असणाºया नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकºयांवर संकट ओढावले आहे़ पाण्याअभावी केळी येऊ शकणार नाहीत, या भितीने शेकडो शेतकरी डोक्यापर्यंत वाढलेल्या केळी कापून काढत आहेत़यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याचा गवगवा शासनदरबारी असलेल्या नोंदीवरून केला जात आहे़ परंतु, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, हदगाव या तालुक्यांना वरदान ठरलेले इसापूर धरण यंदा कोरडेठाक आहे़ संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच इसापूर धरण १२ टक्के एवढे कमी भरले आहे़ त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी हजारो हेक्टरमधील केळी, ऊस, हळद आदी पीकं धोक्यात सापडली़ अर्धापूरसह मुदखेड तालुक्यातील शेतकºयांनी यंदा इसापूर धरणातून पाणीपाळ्या मिळणार नाहीत, हे लक्षात घेवून जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी काढून टाकण्याचा सपाटा लावला आहे़ केळीचे हिरवेगार बन डोक्यापर्यंत ऊंच झालेल्या केळी कापतांना पोटच्या मुलांना मारल्यासारख्या वेदना होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत़ त्यातच बँकाकडून पीकविमा स्विकारला जात नसल्याने शेतकºयांना दुहेरी संकट ओढावले आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या उदासिन धोरणामुळे अडचणीत सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे़ राज्यभरात अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे़ येथून परराज्यातदेखील केळी पाठविली जाते़ जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते़ दरवर्षी अर्धापूर तालुक्यातील अडीच ते तीन हजार हेक्टरवर केळी लागवड केली जाते़ पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा बहुतांश शेतकºयांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविली़ त्यातही हजारो शेतकºयांनी आठशे ते १२०० हेक्टरवर यंदा केळीची लागवड केली़दरम्यान, इसापूर धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला़ दरवर्षी येथून पाच ते सहा पाणीपाळ्या मिळतात़ मागील वर्षात चांगले उत्पादन झाल्याने यंदा केळी लागवड केलेल्या शेतकºयांनी लागवडीपासूनच खर्चावर जोर दिला होता़ यामध्ये टिश्यू कल्चरचे बेणे घेण्यापासून खताची मात्रा, ठिबक आदीवर हजारोंचा खर्च केला़ परिसरातील शेकडो शेतकरी केळी काढून टाकत असल्याने हा खर्च मातीत गेल्यात जमा आहे़