शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराने वाचवले लाखो टन लाकूड; स्मशानभूमीत होतोय गट्टूचा वापर सुरू

By मुजीब देवणीकर | Published: March 18, 2023 4:12 PM

शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी करून त्यापासून गट्टू तयार केले जातात.

छत्रपती संभाजीनगर : अंत्यसंस्कारासाठी शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकूड लागत होते. आता महापालिकेने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने पर्यावरणपूरक लाकडी गट्टूचा वापर सुरू केला आहे. २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत आता अंत्यसंस्कार होत आहेत. शहरातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडी गट्टू वापरले जात आहेत. आणखी चार ठिकाणी लवकरच सुरुवात होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर छत्रपती संभाजीनगर शहराने हा प्रयोग सुरू केला आहे.

अंत्यसंस्कार विधीवतच झाले पाहिजे, यावर आजही नागरिक भर देतात. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपाने विद्युतदाहिनी सुरू केली. मात्र, त्यात अंत्यसंस्कार करायला नातेवाईक तयारच होत नाहीत. त्यामुळे कैलासनगर येथील विद्युतदाहिनी बंद पडली आहे. लाकूड, शेण्यांचा वापर करूनच अंत्यसंस्कार व्हावेत, याकडे अधिक कल असल्याने या प्रकारामुळे शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये दरमहा हजारो टन लाकडाचा वापर होत होता. लाखो झाडांची कत्तल करावी लागत होती. यावर केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लाकडी गट्टूचा पर्याय सुचविला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने २८ जून २०२२ पासून लाकडी गट्टूचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. कोणत्या स्मशानभूमीत वापर? पुष्पनगरी, भीमनगर भावसिंगपुरा, कैलासनगर, मिटमिटा, पडेगाव, एन-६, बेगमपुरा, गादीया विहार, कांचनवाडी, मसनतपूर, मुकुंदवाडी, मुकुंदवाडी गाव आदी ठिकाणी लाकडी गट्टू वापरले जातात.

गट्टूचे दर काय? पंजाब रिनिवल कंपनीकडून लाकडी गट्टूचा पुरवठा प्रत्येक स्मशानभूमीवर स्मशानजोगींना केला जातोय. ७ रुपये ७५ पैसे एका किलोसाठी दर आकारला जातोय. ९० मिमीचा एक गट्टू असतो. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लोखंडी केजसुद्धा या कंपनीने मोफत तयार करून दिले. आतापर्यंत १६० टन गट्टूचा पुरवठा करण्यात आला. २०२४ नंतर किलोमागे दरवर्षी १ रुपयांची वाढ होणार आहे. मनपाने कंपनीसोबत पाच वर्षांचा करार केला.

लाकूड गट्टूत फरक काय? अंत्यसंस्कार करण्यासाठी पूर्वी ३५० ते ४०० किलो लाकूड लागत होते. आता २५० ते ३०० किलो लाकडी गट्टूत अंत्यसंस्कार होत आहेत. विशेष बाब म्हणजे आता धूर अजिबात होत नाही. प्रदूषण रोखण्यात मनपाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

कसे तयार होतात गट्टूखासगी कंपनीची जिल्ह्यात गट्टू तयार करणारी पाच केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्राच्या जवळील शेतकऱ्यांच्या शेतातून जाळण्यायोग्य कचरा खरेदी केला जातो. या कचऱ्यापासून गट्टू तयार होतात.

गट्टूचे फायदेलाकडी गट्टूमुळे प्रदूषण रोखण्यात बरीच मदत होईल. शेतकरी त्यांच्या शेतात कचरा जाळून टाकत होते, ते आता थांबेल. यामुळे त्यांच्याकडून होणारे प्रदूषण थांबेल, त्यांना आता कंपनीद्वारे चार पैसेही मिळत आहेत. यामुळे अनेकांना राेजगार मिळाला आहे. डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका