शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

500 ट्रक चोरी प्रकरण: एमआयएम नगरसेवक जफर शेख अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 3:08 PM

'लोकमत'च्या बातमीचा मोठा इफेक्ट

औरंगाबाद : चोरीचे ५०० ट्रक आणि हायवा गाड्या विकणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी एमआयएम नगरसेवक जफर शेख याला पोलिसांनी आज दुपारी बेड्या ठोकल्या. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. याआधी या प्रकरणात पोलिसांनी जफरचा भाऊ बाबर शेखला अटक केली होती. त्याच्याविरोधात शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.बाबर शेखला काल अटक करण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी जफर शेखला बेड्या ठोकल्या. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. चोरीचे पाचशे ट्रक विकणाऱ्या रॅकेटसंदर्भातील वृत्त 'लोकमत' शनिवारी प्रसिद्ध केलं होतं. यानंतर शनिवारीच बाबर शेखला, तर त्यानंतर आज जफर शेखला पोलिसांनी अटक केली. 500 वाहनांच्या चोरीच्या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या धक्कादायक प्रकरणात महापालिकेतील कोणत्या नगरसेवकाचा सहभाग आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून चोरीचे ट्रक, हायवा आदी महागड्या गाड्या औरंगाबादेत आणून त्यांची संपूर्ण रंगरंगोटी करायची. या वाहनांवर बनावट चेसीस क्रमांक टाकून बीड आरटीओ कार्यालयातून पासिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर ते वाहन विकायचं, असं या टोळीच्या कामाचे स्वरुप होतं. ही टोळी राज्यभरात सक्रीय होती. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. मात्र त्यांना औरंगाबाद पोलिसांकडून फारसं सहकार्य मिळत नव्हतं. मात्र आज मुख्य आरोपी एमआयएम नगरसेवक जफर शेखला अटक झाली. भिवंडी पोलिसांचं हे मोठं यश मानलं जातंय.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtheftचोरी