छत्रपती संभाजीनगर: शहरातील औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. येथून दोन्ही सेना आणि वंचितने उमेदवार आधीच जाहीर केला होता. आज येथून एमआयएमने महापालिकेतील माजी गट नेते नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात नासेर सिद्दिकी यांनी दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ३५. ४ टक्के मते घेतली होती. यामुळे आता मतदारसंघात चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसारख्या नवख्या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील याच मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला होता. तब्बल १० वर्षांनंतर या मतदारसंघात पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. आता शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल मैदानात आहेत. उद्धवसेनेकडून पुन्हा किशनचंद तनवाणी, तसेच एमआयएमकडून २०१९ चे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनाच मैदानात उतरविण्यात आले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने अगोदरच जावेद कुरैशी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथील राजकीय लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१९ मध्ये नासेर सिद्दिकी दुसऱ्या क्रमांकावर२०१९ च्या विधानसभेच्या राजकीय आखाड्यात वंचित मुळे मोठा उलटफेर दिसला. या मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हे ४२.६ टक्के मते घेत विजयी झाले. मात्र, दोन क्रमांकावर 'एमआयएम'चे नासेर सिद्दीकी होते. त्यांनी तब्बल ३५.४ टक्के मते घेतली होती. वंचितचे उमेदवार अमित भुईगळ यांनी तिसऱ्या क्रमांकाची १४.१ टक्के मते घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कदीर मौलाना यांनी ३.८ टक्के मते घेतली होती.
माजी खासदार इम्तियाज जलील कोठून लढणारमाजी खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. पक्षाने आता 'मध्य' मधून नासेर सिद्दिकी यांना उमेदवार जाहीर केल्याने जलील यांच्यासाठी औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर हे मतदारसंघ राहतात. आता जलील त्यांच्यासाठी कोणता मतदारसंघ निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१४ मध्ये कोणाला किती मतेपक्ष-------उमेदवार-- -मिळालेली मते- -- --टक्केवारीएमआयएम- इम्तियाज जलील----६१,८४३-------३२.८शिवसेना---प्रदीप जैस्वाल----४१,८६१--------२२.२भाजप--किशनचंद तनवाणी-----४०,७७०----२१.६राष्ट्रवादी काँग्रेस- विनोद पाटील---११,८४२-----०६.३बहुजन समाज पार्टी-संजय जगताप---११,०४८----५.९मनसे---- राज वानखेडे-----६.२९१------३.३काँग्रेस----एम. एम. शेख-----९,०९३-----४.८