शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने भावाला विहिरीत ढकलले, वर येण्याचा प्रयत्न करताच डोक्यात दगड घातले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 6:55 PM

पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत ३ डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला.

औरंगाबादः मोबाईलसाठी अल्पवयीन भावाने नात्यामधील अल्पवयीन भावाचा ढोरकिन-बालनागर परिसरातील एका विहिरीत ढकलून निर्घृण खून केल्याची घटना आज उघडकीस आली. भावाला मोबाइल मिळाला पण त्याने आपल्या भावाचाच त्यासाठी जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत ३ डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता या प्रकरणी वाळूज पोलीस स्टेशनला २ डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मयताची ओळख पटवली असता वाळूजजवळ असलेल्या शेंदूरवादा गावातील एका १७ वर्षीय मुलाचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची कवटी फुटलेली असल्याने पोलिसांनी याचा अधिक खोलात जाऊन तपास केला. यावेळी हा खून मृताच्या मामेभावाने मोबाईलसाठी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अल्पवयीन मामेभावास ताब्यात घेतले आहे. 

कट करून केला खून, मोबाईल भेटला भाऊ गमवला   काही दिवसांपूर्वी आजोबांनी आत्तेभावाला मोबाइल घेऊन दिला होता. पण मामेभावाला हे पसंत नव्हते. मोबाईल मिळविण्यासाठी त्याने आत्तेभावाचा थेट खून करायचं ठरवलं. पार्टी करुयात असे म्हणून आत्तेभावाने त्याला सोबत घेतले. रस्त्यात ढोरकीन जवळ एका विहिरीवर बिर्याणी खाली. नंतर विहिरीवर आपण फोटो काढू असे म्हणत त्याला जवळ नेले. आत्तेभावाला विहिरीच्या काठावर उभे केले आणि काही कळायच्या आत मामेभावाने त्याला विहिरीत ढकललं. विहिरीत पडल्यास त्याने दोर पकडली पण मामेभावाने वरून त्याच्यावर दगड टाकले. यामुळे गंभीर जखमी होऊन तो खाली कोसळून मरण पावला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद