शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

चिमुकलीने चिठ्ठीद्वारे आईकडे मांडली व्यथा; लेकीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला जामीन नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 7:29 PM

Man sexually abuse his own girl : फारकतीनंतर आरोपीने कधी महिन्‍यानंतर तर कधी दोन महिन्‍यांनंतर मुलीला आईसोबत भेटू दिले. त्‍यामुळे त्या दोघींमधील संवाद बंद होता.

ठळक मुद्दे२०१५ मध्‍ये महिलेने फारकत घेण्‍यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीला १२ एप्रिल २०१९ रोजी मुलीचा ताबा मिळाल्यानंतर ती बापासोबत राहत होती.

औरंगाबाद : स्वत:च्या ११ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिला जीवे मारण्‍याची धमकी देणाऱ्या ३९ वर्षाच्या नराधम बापाने सादर केलेला नियमित जामीन अर्ज विशेष सत्र न्‍यायाधीश ए. एस. खडसे यांनी नामंज़ूर केला. ( There is no bail for the person who sexually abuse his own girl) 

मुलीच्‍या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार १८ मे २००९ रोजी त्यांचे आरोपीसोबत लग्न झाले होते. त्‍यांच्‍यात वाद वाढल्याने फिर्यादी २०१२ पासून मुलीसह आईवडिलांच्‍या घरी राहत होती. २०१५ मध्‍ये महिलेने फारकत घेण्‍यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २३ जुलै २०२१ रोजी दोघांची फारकत झाली. तत्पूर्वी मुलीचा ताबा मिळावा यासाठी आरोपीने न्‍यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीला १२ एप्रिल २०१९ रोजी मुलीचा ताबा मिळाल्यानंतर ती बापासोबत राहत होती. न्‍यायालयाने आठवड्यातून शनिवार आणि रविवार फिर्यादी व मुलीला भेटू द्यावे असे आदेशामध्‍ये नमूद केले होते. मात्र, आरोपीने कधी महिन्‍यानंतर तर कधी दोन महिन्‍यांनंतर मुलीला आईसोबत भेटू दिले. त्‍यामुळे त्या दोघींमधील संवाद बंद होता.

‘काळा चबुतरा’ पूर्वी केवळ नाव घेताच ‘मृत्यूचे’ भय वाटत असलेली जागा आज बनले ‘प्रेरणास्थळ’ 

आई शाळेत गेली अन्‌ घटनेला वाचा फुटलीफेब्रुवारी २०२१ मध्‍ये मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेत आई भेटण्‍यासाठी गेली होती. त्‍यावेळी मुलीने लिहिलेल्या चिठ्ठ्या आईला दिल्या, असे आईने तक्रारीत म्हटले आहे. ‘मला तुझ्याकडे घेऊन जा’ अशी विनवणी केली. आईने चिठ्ठ्या वाचल्या असता आरोपीने स्वत:च्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे बिंग फुटले. न ऐकल्‍यास बाप तिला मारहाण करून जीवे मारण्‍याची धमकी देत असल्याचेदेखील मुलीने चिठ्ठीत म्हटले होते. मुलीने दिलेल्या जबाबातदेखील वरीलप्रमाणेच घटना नमूद केली असल्याचे रिमांड यादीत म्हटले आहे. यासंदर्भात छावणी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

न्यायालयाने जामीन नाकारलागुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक जे. डाके यांनी आरोपीला ३ ऑगस्‍ट रोजी अटक केली होती. न्‍यायालयाने पोलीस कोठडीनंतर आरोपीची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्‍यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी त्याला विरोध केला. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला.

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची यात्रा

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी