लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रॉयल्टी चुकवणाºया गौणखनिज माफियांना मोठ्या प्रमाणात दंड होण्याची भीती सध्या वाटत आहे.यासंदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. औरंगाबाद शहरालगत वर्षानुवर्षे स्टोनक्रशर व दगड खदानी सुरू आहेत. तहसील कार्यालयात याबाबत अभिलेखे ठेवलेले दिसून येत नाहीत. तहसील कार्यालयामधून खदानधारकांकडून रॉयल्टी भरून घेतली जाते. खदानधारक ती रॉयल्टी भरतात व त्या मोबदल्यात किती ब्रास उत्खनन केले याबाबतचा कोणताही अभिलेख जोपासला जात नाही. त्यामुळे विनापरवानगी व विनारॉयल्टी उत्खनन करण्याची संधी खदानधारकांना मिळते व अशा प्रकारे रॉयल्टी चुकविणारे जे गौणखनिज माफिया आहेत, ते मोठ्या प्रमाणावर गौणखनिज उत्खनन करीत आहेत व शासनाचा महसूल बुडवीतआहेत.यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांनी सांगितले की, गौणखनिज उत्खनन परवाने देण्याचे अधिकार गौणखनिज नियम २०१३ मधील नियम-२ नुसार वेगवेगळ्या स्तरांवर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी असे प्रदान करण्यात आलेले आहेत. या जिल्ह्यात तहसीलदार व उपविभागीय अधिकाºयांचे अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत. जिल्हाधिकाºयांकडे असलेले विषय व अधिकार अप्पर जिल्हाधिकारी हे पद निर्माण झाल्यामुळे या विषयाची विभागणी जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकाºयांमध्ये शासन आदेश दि.२९ मार्च २०१२ नुसार करण्यात आलेली आहे. त्यानुसार जे विषय अप्पर जिल्हाधिकाºयांकडे सोपविण्यात आले आहेत, त्या विषयाचे जिल्हाधिकाºयांचे सर्व अधिकार अप्पर जिल्हाधिकाºयांना आहेत.मी स्वत: दौरा केला असता मला औरंगाबाद तालुक्यात व शहरालगतच्या खदान क्रशर अनधिकृतरीत्या विनापरवाना सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित तहसीलदारांना नोटिसा पाठवून रॉयल्टी न भरता उत्खनन सुरू असल्याने शासनाचे उत्पन्न बुडत असल्याबाबत व कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचेही सोरमारे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, गौणखनिजाचा ब्रासनुसार हिशेब ठेवावा लागणार आहे व पूर्ण रॉयल्टीचा शासनास भरणा करावा लागणार आहे.रॉयल्टी चुकवणारे व थोडीफार रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणात उत्खनन करणाºयांमध्ये नाराजी निर्माण झालेली दिसते व रॉयल्टी भरून परवाने दिल्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे, असा आव आणून वेगवेगळ्या तक्रारी करण्यात येत आहेत.सदर गट जिल्हा खानकाम योजनेत समाविष्ट असल्याची खात्री करून व ३० ते ३२ लाख रुपये रॉयल्टीची रक्कम शासकीय खजिन्यात भरणा करून घेऊन तेवढ्या ब्रासच्या मर्यादेत उत्खनन करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. ही माहिती नाकारण्यात आलेलीनाही.
गौणखनिज माफियांना दंड होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:07 AM