शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सहा दिवस बेपत्ता तरुणीने घरी परतताच संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:48 AM

आत्महत्येचे कारण अस्पष्ट; बेपत्ता तरुणीने आई-वडिलांकडे न जाता मामाच्या घरी राहिली होती

वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीने घरी परतल्यानंतर गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना सोमवारी सकाळी पंढरपुरात उघडकीस आली. निकिता रामदास मुगदल (रा. सलामपुरेनगर, पंढरपूर), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

निकिता १७ जुलै रोजी रोजी घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला होता. ती न सापडल्याने तिची आई अरुणा मुगदल यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोहेकॉ रेखा चांदे तिचा शोध घेत असतानाच रविवारी (दि.२३) निकिता घरी परतली. नातेवाइकांनी तिला सोबत घेऊन पोलिस ठाण्यात नेले. तिने मी स्वत: घरातून निघून गेले, तसेच माझी कोणाविरोधात तक्रार नसल्याचा जबाब पोलिस ठाण्यात दिला होता.

घरी परतताच संपविले जीवनपोलिस ठाण्यातून पंढरपुरात आल्यानंतर निकिताने आईसोबत जाण्याऐवजी पंढरपुरातच मामा व आजीच्या घरी राहण्याचा आग्रह करून ती मामाकडेच थांबली होती. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिने मामाच्या घरी दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये छताच्या हूकला उपरणे बांधून गळफास घेतला. घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजाऱ्यांनी निकिताने गळफास घेतल्याचे पाहून या घटनेची माहिती तिच्या नातलगांना दिली. नातेवाईक विक्रम म्हात्रे, गौतम गायकवाड यांनी तिला खाली उतरविले. उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोहेकॉ राजेंद्र उदे यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी