शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

मयताचे पैसे सेवानिवृत्तास !

By admin | Published: November 25, 2014 12:24 AM

बीड : रजा असतानाही कर्तव्य बजावणाऱ्यास निवृत्तीनंतर रोखीकरणाच्या स्वरूपात वेतनानुसार रक्कम दिली जाते़ एका कर्मचाऱ्याचे अशाच प्रकारचे रोखीकरणाचे पैसे

बीड : रजा असतानाही कर्तव्य बजावणाऱ्यास निवृत्तीनंतर रोखीकरणाच्या स्वरूपात वेतनानुसार रक्कम दिली जाते़ एका कर्मचाऱ्याचे अशाच प्रकारचे रोखीकरणाचे पैसे निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांना मिळण्याऐवजी दुसऱ्याच एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा झाले़ जि़ प़ च्या आरोग्य विभागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़जि़ प़ आरोग्य विभागात पी़ एऩ अंदूरकर हे कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते़ १४ सप्टेंबर २०१४ रोजी ते सेवानिवृत्त होणार होते़ मात्र दुर्दैवाने २३ डिसेंबर २०१३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले़ त्यांच्या निधनानंतर ग्रॅच्युएटी तसेच निवृत्ती वेतनाचा लाभ त्यांच्या पत्नीला मिळाला़ मात्र रजेच्या काळात काम केल्याबद्दलचे २ लाख ५९ हजार ३७८ रूपये येणे बाकी होते़ दुसरीकडे याच कार्यालयात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत असलेले बी़ एस़ देशमुख हे ३१ जुलै २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले़ त्यानंतर १७ आॅक्टोबर २०१४ रोजी शासनाकडून एकाच वेळी ३८ कर्मचाऱ्यांचे अर्जित रजा व इतर सेवेचे पैसे आरोग्य विभागाकडे आले़ धनादेश क्रमांक ९८८९२६ नुसार एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात आला़ यात मयत अंदूरकर यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम निवृत्त कर्मचारी देशमुख यांच्या खात्यावर जमा झाली़ खात्यावर जमा झालेला निधी जीपीएफचा समजून देशमुख यांनी तो उचलला़ इकडे अंदूरकर यांचे नातेवाईक आरोग्य विभागात अर्जित रजेच्या पैशासाठी खेटे घालून थकले़ त्यांनी केलेल्या चौकशीनंतर अंदूरकरासाठी आलेला निधी देशमुखांच्या खात्यात गेल्याचे समोर आले़ हा पैसा चुकून देशमुख यांच्या खात्यात गेल्याचे सांगितले जात आहे़ मात्र माझ्या वडिलांनी रजा न घेता कर्तव्य बजवलेले आहे़ त्यांच्या घामाचा दाम त्यांच्याच वारसाना मिळायला हवा, अशी मागणी अंदूरकर यांचे पुत्र पी़ पी़ अंदूरकर यांनी केली आहे़ दरम्यान, देशमुख यांनी पैसे परत करण्याची भूमिका घेत माणुसकीचे दर्शन घडविले आहे़ (प्रतिनिधी)आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायक एल़ जी़ रामदासी यांनी ही बिले तयार केली होती़४त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़४शिवाय निवृत्त कर्मचारी देशमुख यांना देखील १ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून खात्यात जमा झालेले अंदूरकर यांचे पैसे आरोग्य विभागाला परत करण्याचे कळविले आहे़असे व्हायला नको होते४जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले, आमच्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना त्रास व्हायला नको होता़४मात्र, संबंधितांकडून पैसे परत घेऊन अंदूरकर कुटुंबियांना देण्यात येतील़४रामदासी यांनी तांत्रिक चूक असल्याचा दावा ‘लोकमत’शी बोलताना केला़