वाळूज महानगर : वडगावातून २२ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. पूजा अमोल टोम्पे (२२ रा.गंगोत्री पार्क, वडगाव) ही बुधवारी (दि.२१) सकाळी पती कंपनीत कामाला गेल्यावर घराला कुलूप लावून निघून गेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरमालकीनीने अमोल टोम्पे यांना ही माहिती दिली. सर्वत्र शोध घेऊनही पत्नी मिळून न आल्याने अमोल टोम्पे यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
फोटो -पूजा टोम्पे (बेपत्ता)
-------------------------
दुचाकीच्या धडकेने पादचारी जखमी
वाळूज महानगर : भरधाव व निष्काळीपणे दुचाकी चालवुन वृध्द पादचाºयास जखमी करणाºया फरार दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक अहिरे (रा.जयभवानी चौक, बजाजनगर) हे १९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जयभवानी चौकातुन पायी घराकडे चालले होते. यावेळी पाठीमागुन भरधाव येणाºया दुचाकीचालकाने (एम.एच.२०,एफ.एल.३७२५) वाल्मिक अहिरे यांना जोराची धडक देऊन घटनास्थळावरुन फरार झाला. या प्रकरणी जखमी वाल्मिक अहिरे यांचा मुलगा शिवदास यांच्या तक्रारीवरुन फरार दुचाकी चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
रांजणगावातुन महिला बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथुन २३ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली आहे. सुमैय्या जहिरोद्दीन शेख (२३रा. रांजणगाव) ही महिला बुधवार (दि.२१) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मी बाहेरुन जाऊन येते, असे पतीला सांगुन घराबाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत सुमैय्या शेख ही घरी न परतल्याने तिच्या पतीने सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही मिळून न आल्याने जहिरोद्दीन शेख यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
फोटो क्रमांक- सुमैय्या शेख (बेपत्ता)
---------------------
बजाजनगरातुन दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : बजाजनगरातुन दुचाकी लांबविणाºया चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित बलवीर शर्मा (रा.बजाजनगर) हे लक्ष्मी जैन यांच्या नावावर असलेली दुचाकी (एम.एच.२०,ई.डी.५०३०) वापरतात. १६ जुलै रोजी मोहित शर्मा ही दुचाकी घरासमोर उभी केली होती. चोरट्याने ही दुचाकी चोरुन नेली.
-------------------------
वाळूजमध्ये वृक्षारोपण
वाळूज महानगर : वाळूज येथे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील विजयनगरात विठ्ठल त्रिभुवन, भाकपचे जिल्हा सहसचिव अभय टाकळसाळ, कॉ. ईब्राहिम पटेल, वलीमिय्या, तौफीक पटेल, कॉ.रतन अंबीलवादे, कॉ.किशोर सोनवणे आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
-------------------------------
वाळूजला प्रकल्प लेखन कार्यशाळा
वाळूज महानगर : वाळूज येथील राजर्षी शाहु महाविद्यालयात आॅनलाईन प्रकल्प कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.निशीकांत आल्टे तर अध्यक्षस्थानी डॉ.युसुफ पठाण हे होते. कार्यशाळेत प्राचार्य डॉ.आल्टे,डॉ.युसुफ पठाण यांनी प्रकल्प लेखनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मौलाना आझाद महाविद्यालयाचे इतीहास विभाग प्रमुख डॉ.शेख मुसका यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प लेखनाविषयी मार्गदर्शन करुन विविध टिप्स दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताकि डॉ.युलिसिस भालेराव, सूत्रसंचालन प्रा.सय्यद मुजीब यांनी केले.
--------------------------------