शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

मिशन ॲडमिशन: आवडीचे पाॅलिटेक्निक काॅलेज मिळण्यासाठी १७,४७० विद्यार्थ्यांनी दिले पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 1:36 PM

पाॅलिटेक्निक प्रवेशाची पहिली फेरी, आजपासून प्रवेश निश्चिती, अलाॅटमेंट जाहीर

औरंगाबाद : मराठवाड्यातील १० शासकीय व ४७ खासगी पाॅलिटेक्निक काॅलेजच्या १५ हजार ४० जागा असून, पहिल्या प्रवेश फेरीसाठी अलाॅटमेंट गुरुवारी जाहीर झाले. विद्यार्थ्यांच्या २१ हजार ६३४ अर्जांपैकी १७ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ऑप्शन फार्म भरले. मिळालेले अलाॅटमेंट विद्यार्थ्यांना लाॅगीनमधून स्वीकारून आज, शुक्रवारपासून ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार आहे.

मराठवाड्यातील तब्बल ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, पूर्ण अर्ज भरून पर्याय भरलेल्या अर्जांची संख्या निम्म्यावर आली. त्यातून आवडीचे काॅलेज, आवडीची शाखा मिळालेले विद्यार्थ्यी आजपासून प्रवेश निश्चितीला सुरुवात करतील. एकूण तीन प्रवेश फेरी आणि संस्था स्तरासह सर्व प्रवेशाची अंतिम ३० सप्टेंबर असणार आहे. पहिल्या फेरीत अलाॅटमेंट लाॅगीनमधून स्वीकारण्यासाठी २९ ऑगस्ट, तर २६ ते ३० ऑगस्ट काॅलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी ३१ ऑगस्टला जाहीर होईल. १ ते ४ सप्टेंबर ऑप्शन फाॅर्म भरा, तर दुसऱ्या फेरीची अलाॅटमेंट लिस्ट ६ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. ७ ते १० सप्टेंबर अलाॅटमेंट निश्चिती, तर ७ ते१७ सप्टेंबर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती, तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा १२ सप्टेंबर रोजी जाहीर होतील. याच दिवशी पाॅलिटेक्निकचे वर्ग सुरू होणार आहेत. १३ ते १५ तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन भरणे, १८ ते २२ दरम्यान प्रवेश निश्चिती करून २२ ते २९ संस्था स्तरावरील प्रवेश होतील.

रोजगारक्षम संगणकीय ज्ञान देणारसंगणक क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे पाॅलिटेक्निक सोबत इच्छुक विद्यार्थ्यांना आवश्यक रोजगारक्षम संगणकीय ज्ञान देण्यात येणार आहे. उद्योगक्षेत्रातील मागणीनुसार सक्षम करण्याचा उपक्रम शासकीय पाॅलिटेक्निकमध्ये यावर्षीपासून सुरू करत असल्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे म्हणाले.

८० टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत पसंतीक्रम दिले. पहिल्या फेरीत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत अधिक प्रवेश होण्याची अपेक्षा आहे. यावर्षी १०० टक्के जागा भरल्या जातील. पहिल्या फेरीनंतर १२ सप्टेंबरपासून पाॅलिटेक्निकचे वर्ग सुरू होतील.-उमेश नागदेवे, सहसंचालक, तंत्रशिक्षण, औरंगाबाद

या विद्यार्थ्यांनी भरले पर्यायजिल्हा - काॅलेज -नोंदणी -पर्याय भरलेऔरंगाबाद-१३ -४७१२ -४६८२बीड -१० -३३३६ -२७०३हिंगोली -२ -६०३ -४२२जालना -५ -२०९४ -१७२३लातूर -१३ -४४९३ -३६०४नांदेड -७ -२६१८ -२१२५उस्मानाबाद -४ -१७४५ -१३९७परभणी -३ -१०२२ -८२३

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र