छत्रपती संभाजीनगर : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. आयटीआय संस्थांमध्ये प्रवेशासाठी १२ जूनपासून ऑनलाईन नोंदणी करता येत असून, ही नोंदणी ११ जुलैपर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतरच्या फेऱ्यांचेही वेळापत्रक जाहीर झाले आहे. मराठवाड्यात शासकीय ८२ व खासगी ६२ आयटीआय संस्थांमध्ये तब्बल २२ हजार १२० जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकीय आणि खासगी आयटीआय संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षांसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. शासकीय संस्थांमध्ये १५ हजार २०० जागा उपलब्ध असून, खासगी संस्थांमध्ये सहा हजार ९२० एवढी संख्या उपलब्ध आहेत.
अशा आहेत जिल्हानिहाय संस्थामराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकूण १४४ आयटीआय शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यात शासकीय १२, खासगी १५, छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ व ६, हिंगोलीत ६ व ३, जालनात ८ व ४, लातूरमध्ये ११ व १०, नांदेडमध्ये १७ व ८, धाराशिवमध्ये ८ व १० आणि परभणी जिल्ह्यात नऊ शासकीय, तर सहा खासगी आयटीआय आहेत.
आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक- अर्ज नोंदणी : १२ जून ते ११ जुलै- प्रवेश अर्ज निश्चिती : १९ जून ते ११ जुलै- प्राथमिक गुणवत्ता यादी १३ जुलै- अंतिम गुणवत्ता यादी १६ जुलै- पहिल्या फेरीची यादी २० जुलै- दुसरी फेरीसाठी निवड यादी ३१ जुलै- तिसरी फेरी ९ ऑगस्ट- चौथ्या फेरीतील प्रवेश २१ ते २४ ऑगस्ट- संस्था स्तरावरील समपुदेशन फेरी २७ ते २८ ऑगस्ट
आयटीआय संस्था, प्रवेश क्षमताची आकडेवारीजिल्हा.........शासकीय जागा..........खासगी जागा........एकूणछत्रपती संभाजीनगर....२४४०........४९२..........२९३२बीड..........२१७२................१४१६............३५८८हिंगोली......६४४...........३७२................१०१६जालना.........१४४४...........१६४..........१६०८लातूर..........२४८०.........११५२..........३६३२नांदेड.........२५९२........१६३६..........४२२८धाराशिव......१८१६......६८०.............२४९६परभणी.......१६१२.......१००८.........२६२०एकूण........१५२००.......६९२०...........२२१२०
ऑनलाईन अर्ज करावाआयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही तुकड्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तत्काळ प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा.- अभिजित आलटे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर