औरंगाबाद : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बी.ई., बी.टेक. या चार वर्षांच्या आणि मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नाॅलाॅजी या इंटिग्रेटेड पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीला बुधवारपासून सुरुवात झाली. ४ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणीस वेळ देण्यात आली आहे.
सीईटी सेलच्या संकेतस्थळावर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमानुसार, फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक, सूचना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीसाठीसंदर्भात सूचना काळजीपूर्वक वाचून विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. दुसऱ्या फेरीसाठी २२ ऑक्टोबरपासून, तर तिसऱ्या फेरीसाठी १ नोव्हेंबरपासून प्रवेश सुरू होतील. त्याच दिवशीपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल. जागा रिक्त राहिल्या, तर त्यांच्यासाठी १० ते १७ नोव्हेंबरची मुदत आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत तीन प्रवेश फेरीसह समुपदेशन फेरी प्रवेशासाठी घेतली जाणार आहे.
...असे असेल वेळापत्रकऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे : ४ ऑक्टोबर दुपारी ४ वाजेपर्यंतकागदपत्रे पडताळणी अर्ज निश्चिती : ४ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंततात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी : ७ ऑक्टोबरआक्षेप नोंदवणे : ८ ते १० ऑक्टोबरअंतिम गुणवत्ता यादी, जागावाटप : १२ ऑक्टोबरपहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय भरणे : १३ ते १५ ऑक्टोबर जागावाटप : १८ ऑक्टोबर जागावाटप स्वीकृती : १९ ते २१ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंतमहाविद्यालयात प्रवेश निश्चिती - १९ ते २१ ऑक्टोबर दुपारी ५ वाजेपर्यंत