शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

‘मिशन बिगीन अगेन’ : औरंगाबादमधील लॉकडाऊन राहणार ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 2:27 PM

‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत ज्या अटी लागू आहेत त्यानुसारच यापुढेही लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 

ठळक मुद्देसद्य:स्थितीत ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत निर्णयाची होणार अंमलबजावणी शहरात एकीकडे बाजारपेठ सुरळीत होत असताना कोरोनाची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुन्हा लागू होण्याची चर्चा सुरू होती. ती केवळ अफवा ठरली.

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे १५ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्यासंबंधी केवळ सोशल मीडियात चर्चा असून, प्रत्यक्षात जिल्हा किंवा महापालिका प्रशासनाने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासंदर्भात कोणतेच संकेत दिलेले नाहीत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत ज्या अटी लागू आहेत त्यानुसारच यापुढेही लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 

शहरात कोरोनामुळे मृत्यू आणि रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात येणार असल्याची जोरात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरील विविध ग्रुपवर त्या पद्धतीचे ‘मेसेज’ फिरत असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्येही लॉकडाऊन पुन्हा लागू होते की काय, अशी चर्चा सुरू झाली. यासंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दांत लॉकडाऊन पुन्हा लागू होण्यासंबंधी कोणतीची चर्चा प्रशासकीय पातळीवर झाली नसून, शासनाकडूनही तशा सूचना नसल्याचे सांगितले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत ज्या सूचना केलेल्या आहेत, तसेच लॉकडाऊनमध्ये जी शिथिलता दिलेली आहे, त्याचीच अंमलबजावणी होईल. महापालिकास्तरावरही अद्याप नव्याने लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात काही सूचना किंवा संकेत मिळालेले नाहीत, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. 

शासनाच्या परवानगीशिवाय किंचितही बदल नाहीमहाराष्ट्र शासनाने १ जून रोजी अध्यादेश काढून लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने सूट दिली. या आदेशाची अंमलबजावणी महापालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात मागील दोन दिवसांपासून रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित होणार, अशी अफवा मागील दोन-तीन दिवसांपासून पसरविण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. राज्य शासनाच्या परवानगीशिवाय काहीच होणार नाही. सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये औरंगाबादकरांना जीवनावश्यक वस्तू दररोज खरेदी करण्याची मुभा राज्य शासनाने दिलेली आहे. त्याचप्रमाणे शहरातील व्यापाऱ्यांना सम व विषम पद्धतीने दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. हीच पद्धत यापुढेही चालू राहणार आहे.     - आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त

लॉकडाऊनमध्ये काहीही बदल होणार नाहीतसोशल मीडियात काहीही अफवा पसरू द्या, शासनाच्या आदेशाने लॉकडाऊन जसे सुरू आहे, तसेच राहणार. त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. ३० जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये  बदल होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही, तसेच शासनाकडून अद्याप यासंबंधीच्या काहीही सूचना आलेल्या नाहीत. नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वत:च काळजी घ्यावी. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहरातील सर्व बाजारपेठांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोकळीक देण्यात आली आहे. या सवलतीमुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. असे असले तरी शहर व जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. नागरिकांची स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंंंग पाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, गर्दीत जाऊ नये. कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करावे.- उदय चौधरी, जिल्हाधिकारी 

लॉकडाऊनचा निर्णय मनपा आयुक्तांचाशहरातील लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांचा आहे. ते यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आम्ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासंदर्भात भूमिका पार पाडत आहोत. सध्या तरी लॉकडाऊन नेहमीप्रमाणेच राहील, असे दिसत आहे. - चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त 

नियमांचे पालन :- शहरात सम- विषम पद्धतीने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असून, ही पद्धत व्यापाऱ्यांनीदेखील स्वीकारली आहे. व्यापारी ग्राहक तसेच स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूक असून, त्या पद्धतीने अनलॉकच्या नियमांचे पालन होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शहरातील दुकानदारांनी व्यवहार सुरू केले आहेत. - अनेक लहान-मोठ्या दुकांनासमोर सॅनिटायझरची बाटली लटकवलेले लोखंडी स्टँड दिसत आहेत. काही दुकानांत सुरक्षारक्षक, तर काही दुकानांत खास कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक ग्राहकाची थर्मल गनने तपासणी केली जात आहे. त्यानंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद