शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

४५ हजार कोटींची तरतूद कागदावरच, यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर?

By विकास राऊत | Published: July 26, 2024 8:01 PM

सरकार निवडणुकीच्या तयारीत,गेल्या वर्षीच्या बैठकीत ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. हे सगळे पॅकेज कागदावर आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी १६ सप्टेंबर रोजी या विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती. यावर्षी मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला सरकार लागल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्षीच्या बैठकीत ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. हे सगळे पॅकेज कागदावर आहे. सिंचनासाठी १४ हजार कोटींचे वेगळे पॅकेज जाहीर केले होते, त्यातही काही निर्णय झाले नाहीत. पॅकेजचा आढावा घेण्यासाठी बैठक होणे अपेक्षित असताना निवडणुकीमुळे बैठक होण्याची शक्यता मावळल्याचा सूर सत्ताधारी पक्षातूनच आळविण्यात येत आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींद्वारे भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेला ११ महिने झाले. या कामांप्रकरणी अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद शासनाने केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनादेखील विसर पडला. स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त लागणे शक्य नाही.

अधिवेशन संपले, आता मिशन इलेक्शन?जलसंपदा विभागाला २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये, तर सा. बां. ला १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख रुपयांची घोषणा गेल्यावर्षी केली. ४५ पैकी ३४ हजार ५१८ कोटी या दोन विभागांसाठीच दिले. उर्वरित १० हजार ४८२ पैकी ७ हजार ८६ कोटी जिल्हानिहाय विविध योजनांसाठी घोषित केले. ३३९६ कोटी इतर कामांसाठी आहेत. जलसंपदा अनुशेषासह बांधकाम विभागाचे सुमारे ५ हजार कोटींचे देणे शिल्लक आहे. पावसाळी अधिवेशनानंतर राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. साधारणत: सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे या पॅकेजची घोषणा ही घोषणाच ठरणार, अशी चर्चा आहे.

काहीही सांगता येणार नाहीमराठवाड्यात यावर्षी मंत्रिमंडळ बैठक होणार की नाही, याबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही.- संजय शिरसाट, प्रवक्ता शिंदेसेना

सगळे इलेक्शन मोडमध्येसगळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक यावर्षी होईल, असे वाटत नाही.- अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री

त्या पॅकेजचा तरी आढावा घ्या....गेल्या वर्षी जाहीर केलेल्या सिंचनासह सर्वसाधारण पॅकेजचा तरी शासनाने आढावा घेऊन खरी परिस्थिती समोर आणली पाहिजे. मंत्रिमंडळ बैठक झाली पाहिजे. परंतु सरकार त्या ‘मूड’मध्ये दिसत नाही.-डॉ. शंकर नागरे, माजी तज्ज्ञ सदस्य, मराठवाडा विकास मंडळ

जिल्ह्यासह सर्व विभागांसाठी : ४५ हजार कोटीसिंचनासाठी : १४ हजार ४० कोटीजिल्हानिहाय घोषणा अशाछत्रपती संभाजीनगर : २ हजार कोटीधाराशिव : १ हजार ७१९ कोटीबीड : १ हजार १३३ कोटीलातूर : २९१ कोटीहिंगोली : ४२१ कोटीपरभणी : ७०३ कोटीजालना : १५९ कोटीनांदेड : ६६० कोटीएकूण : ७ हजार ८६ कोटी

टॅग्स :MarathwadaमराठवाडाEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद