औरंगाबाद : आमदार बंब हे प्यादे आहेत. त्यांचा बोलवत्या धन्या विरुद्ध बोलावे लागेल. महाराष्ट्र नामथुरामी वृत्ती यशस्वी होणार नाही. याची काळजी घ्यावी. ही बोलणारी प्यादी तुमची नाहीत. हे जाहीर करा. फिनलँड चे शिक्षक रस्त्यावर आले. तेथील सरकार कोसळले. शिक्षकांची ताकद लक्षात घ्या. समजवाद नसेल तर विषमता वाढेल. सरकार दोन कोटी नोकऱ्या देणार होते किती नोकऱ्या दिल्या. असा सवाल उपस्थित करत सरकारला विनंती करू आमच्या नांदी लागू नका. सन्मान राखा, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करा. असे शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले.
वरून धो धो पाऊस सभेच्या ठिकाणी गुडघाभर पाणी त्यात उभ्या हजारो शिक्षकांची आत्मसन्मान रॅलीच्या समारोपाने रविवारी राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आमदार विक्रम काळे यांनी आ बंब यांना आव्हान देत गंगापूर खुलताबाद मध्ये पायलट प्रोजेक्ट राबवा. शिक्षकांना घरे बांधून द्या. तेथील शिक्षक गावात राहतील. मतदार संघात रस्ते बघा. उगाच शिक्षकांना अपमानित करू नका. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही फोनवरून शिक्षकांशी संवाद साधला. आ सतीश चव्हाण यांनीही या रॅलीत हजेरी लावली.
बहुतांश शिक्षक चांगले काम करताहेत असताना त्यांच्याबद्दल नाकात्मक वातावरण निर्मिती करणाऱ्यांचा वृत्तीचा निषेध करतो. असे होत असताना शासन गप्प का? मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका जाहीर करावी. यावर चुप्पी साधने म्हणजे दुटप्पीपणा आहे. असे आ. सुधीर तांबे म्हणाले. शिक्षक नेते भाऊसाहेब चासकर म्हणाले शिक्षकांना वर्गात शिकवू द्यायचे नाही आणि गुणवत्तेची बोंब मारायची हे योग्य नाही. अशैक्षणिक कामे शिक्षकांना नको. लोकप्रतिनीधिंनी गुणवत्तेवर बोलावे त्याआधी शिक्षणातील समस्या सोडवा. शाळांना डेटा एन्ट्री ऑपरेटर द्यावे. मुख्यालयी राहण्याची अट कायमची रद्द करा. शिक्षकांचे प्रतिमभंजनाचे जाणीवपूर्वक होणारे प्रयत्न शिक्षक खपवून घेणार नाही.
शिक्षकांच्या हक्कासाठी आमखास मैदानात जमले हजारो शिक्षक
जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या मुख्यालयी वास्तव्याचा संदर्भ शैक्षणिक गुणवत्तेशी जोडुन शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न काही घटकांकडुन होत आहे. या अपप्रचारामुळे शिक्षक अस्वस्थ आहेत. वंचित समाज घटकांसाठी प्रतिकुल परिस्थितीतही पोटतिडीकीने काम करणाऱ्या शिक्षकांविरूद्ध गैरसमज निर्माण केले जात आहे. म्हणुन शिक्षकांच्या आत्मसन्मानाच्या लढ्याला समर्थन देण्यासाठी आणि शिक्षणविषयक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सन्मान रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आल्याचे प्रकाश दाणे, सुभाष महेर, अनिल देशमुख म्हणाले.
या रॅलीत शिक्षक भारती सह शिक्षक सेना, जुनी पेन्शन हक्क संघटना, द्विव्यांग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटना, उर्दु शिक्षक संघटना, मुष्टा शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
रॅलीच्या मागण्या अशा आहे
-शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथील करा अथवा मुख्यालयी शासकीय
-निवासस्थाने बांधुन द्या.
-शिक्षकांना अशैक्षणीक कामे देऊ नका.
-सरकारी शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज करा.
-अन्यायकारक धोरणे रद्द करा. -विद्यार्थ्यांनींचा उपस्थिती भत्ता वाढवून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या.
-शिक्षकांची व शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व रिक्त पदे तात्काळ भरा.
- २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन द्या.
-वस्ती शाळा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्या.
-शिक्षक सन्मान रॅलीच्या माध्यमातून केलेल्या वरिल मागण्या आणि शिक्षकांची भुमिका आपण शासनापर्यंत पोहोचवावी ही विनंती विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.