कन्नड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात आमदार उदय सिंग राजपूत यांची प्रकृती अचानक खालावली. दरम्यान, आ. राजपूत यांच्यावर प्रथम शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम मेहेगाव जवळील भगवान गड येथे शनिवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे डॉ अण्णा शिंदे, राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे यांच्या भाषणानंतर माजी आमदार किशोर पाटील यांचे भाषण सुरु असतांना आमदार उदयसिग राजपुत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्ने. त्यांना प्रथम कन्नड येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
आमदार उदयसिंग राजपुत यांनी उपाशी पोटी गोळ्या घेतल्या. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने जाधव नर्सिंग होम, कन्नड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या व्यतिरिक्त त्यांना अन्य काहीही त्रास नाही.अपचन आणि उपाशी पोटी गोळ्या घेतल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते.- डॉ सिताराम जाधव, कन्नड