छत्रपती संभाजीनगर : आतापर्यंत जिल्ह्यात अपयशी ठरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शड्डू ठोकणार आहे. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सुमारे २२५ ते २५० जागांवर निवडणुका लढवू, असे घोषित करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदासंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
शक्यता काय ?मनसेने गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत मोदींना पाठिंबा देणार असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे मनसे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात नव्हती. त्या निर्णयामुळे मनसेची जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी महायुतीच्या खेम्यात जाऊन बसली. विधानसभा निवडणुकीत विजयाचे गणित मनसेच्या एंट्रीमुळे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमसह अपक्ष अशा बहुरंगी लढती निवडणुकीत दिसणे शक्य आहे.
वर्ष कोणते? .... भूमिका काय?.......... काय झाले?२००९........ मनसेने लोकसभा निवडणूक.......... उमेदवाराचा पराभव झाला.२००९ ...... विधानसभा निवडणूक......... राज्यातून मनसेचा एक आमदार२०१०.........महापालिका निवडणुकीत ५३ जागा लढविल्या........सर्वच ठिकाणी हार २०१४ .......विधानसभा निवडणूक...... मनसेने लढविली परंतु यश मिळाले नाही.२०१५........निवडणुकांपासून मनसे अलिप्तच
लढणार आणि जिंकणार....सगळ्या जागा लढण्याचा निर्णय मनसेप्रमुख ठाकरे यांच्या बैठकीत झाला आहे. जिल्ह्यात पक्षबांधणीची तयारी पूर्णत: झाली आहे. असे जिल्हाप्रमुख सुमीत खांबेकर यांनी सांगितले. ग्रामीण जिल्हाप्रमुख दिलीप बनकर म्हणाले, मनसे जिल्ह्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढून विजयश्री खेचून आणेल.