कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकविण्याचा काही शाळा प्रयत्न करीत आहेत. शासनाने परीक्षा रद्द केल्या असल्या तरी अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना नियमानुसार वर्गोन्नती द्यावयाची असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कायम ऑनलाईन संपर्कात राहावे लागते. तसेच शालेय पोषण आहार वितरणाची सूचनासुद्धा ऑनलाईन पद्धतीने द्यावी लागते. परंतु, गेल्या महिन्यापासून सिडको हडकोसह हर्सूल टी पॉइंट लगत असणाऱ्या मयूरपार्क, भगतसिंगनगर, पिसादेवी रोड व परिसरात खासगी कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कला व्यवस्थित रेंज मिळत नसल्याने मध्येच फोनचा संपर्क खंडित होणे, ऑनलाईन व्यवहार न होणे, इतरांशी लवकर संपर्क न होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. बऱ्याचदा रेंज कमी जास्त होत राहतो. त्यामुळे वर्क फ्रॉम होम मध्येही मोठा व्यत्यय निर्माण होतो. वेळीच ही समस्या दूर झाली पाहिजे, अशी मागणी या भागातील मोबाईलधारकांची आहे.
रेंज नसल्याने मोबाईल ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:05 AM