लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दंगा, जबरी चोरी, दरोडा, पळवून नेणे, दरोड्याची तयारी करणे, शस्त्र बाळगणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व बिभीषण चाटे (अंबाजोगाई) म्होरक्या असलेल्या टोळीविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये म्होरक्याच्या मुसक्या आवळण्यात अंबाजोगाई पोलिसांना यश आले असून, दोघांचा शोध सुरू आहे.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मोका, एमपीडीए, तडीपार यासारख्या कारवायांवर भर दिला आहे. अंबाजोगाई व परळी तालुक्यांत गुन्हे करणाºया बिभीषण चाटेच्या टोळीविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यांना वारंवार अटक करून कारागृहातही पाठविले आहेत; परंतु त्यांच्यात सुधारणा झाली नाही. अखेर या टोळीविरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. महानिरीक्षकांनी अंबाजोगाईचे सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना तपास करण्याचे आदेश दिले.यामध्ये त्यांना या टोळीविरोधात गंभीर गुन्हे असल्याचे समोर आले. त्यांनी म्होरक्या असलेल्या बिभीषण चाटेची माहिती काढली. सापळा रचून त्याच्या राहत्या घरातून मुसक्या आवळण्यात आल्या.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.डी. गित्ते, फौजदार वाघमारे, अडके, संजय गुंड, मोरे, नन्नवरे, राऊत आदींनी केली.
बिभीषण चाटे गँगवर ‘मोका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:30 AM